कोल्हापूर : गार्डन क्लब कोल्हापूर यांचेमार्फत नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या उद्यान स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघाकडील गोकुळ प्रकल्प, ताराबाई पार्क कार्यालय व महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल या विभागांनी सहभाग घेतला होता. यामध्ये उद्यान स्पर्धेत ताराबाई पार्क कार्यालयास द्वितीय क्रमांक, व गोकुळ प्रकल्प आणी महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यास तृतीय क्रमांक मिळाला आहे. तसेच १४,१५ व १६ डिसेंबर २०१९ रोजी गार्डन क्लब कोल्हापूरने महावीर गार्डन कोल्हापूर येथे पुष्प प्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये देखील गोकुळ प्रकल्प व महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथील गुलाब व विविध ४८ प्रजातीची फुले या स्पर्धेमध्ये आणली होती. त्यामध्ये प्रथम क्रमांकाची १२ बक्षीसे, द्वितीय क्रमांकाची १७ बक्षसे, तृतीय क्रमांकाची १० बक्षीसे संघास मिळाली.
यावेळी बक्षीसे स्विकारताना गोकुळचे कार्यकारी संचालक श्री.डी.व्ही.घाणेकर, गार्डन ऑफीसर श्री.एम.बी.गायकवाड, कर्मचारी पांडूरंग शेळके, रंगराव कोळेकर, लखु खिलारी, कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज श्री. संजय रोटे,मॅन्युफॅक्चरर्स असोशियशनचे अध्यक्ष अतुल पाटील, गार्डन क्लब कोल्हापूरच्या अध्यक्षा सौ. कल्पना सावंत आदी उपस्थित होते.