कोल्हापूर /प्रतिनिधी
समर्थ भारताची निर्मिती तसेच हिंदूंवर होणारे अन्याय ,अत्याचारावर वाचा फोडून धर्मशिक्षणाच्या माध्यमातून हिंदूंना संघटीत करणे .त्याचबरोबर हिंदू राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे या हेतूने हिंदू जनजागृती समितीचे काम सुरू असून कोल्हापूरात रविवार दिं.२२ डिसेंबर रोजी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल मैदान खरी कार्नर येथे हिंदू राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आलयं. अशी माहिती मनोज खाडये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हिंदू जनजागृती समिती ही धर्मजागृती ,धर्मशिक्षण, धर्मरक्षण,हिंदू संघटन आणि राष्ट्र रक्षण या पंचसूत्रीवर हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य करणारी संस्था आहे. त्यामुळे याचाच एक भाग कोल्हापूरात दि.२२ डिसेंबर रोजी हिंदू राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आल्याचं मनोज खाडये यांनी सांगितलं.या सभेत लष्कर-ए-हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर गुजरात ,पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक मनोज खाडये,अधिवक्ता समीर पटवर्धन तसेच सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सदगुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच या सभेसाठी जिल्ह्यातील १५०हून अधिक गावांमध्ये प्रचार करण्यात आला असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे,महिला गट,हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका पार पडल्या आहेत. दरम्यान सभा प्रचारासाठी दिं. २०डिसेंबर रोजी सकाळी ११वा. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल पासून वाहनफेरी काढण्यात येणार आहे. तरी या वाहनफेरी सह रविवारी होणाऱ्या हिंदू राष्ट्र-जागृती सभेस जिल्ह्यातील हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच आवाहन खाडये यांनी यावेळी केलयं.
पत्रकार परिषदेला हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता प्रकाश खोंद्रे,शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव उपस्थित होते.