कोल्हापूर /प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या वतीनं नुकतचं पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान यांसह अन्य देशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख,बौध्द ,जैन ,पारसी धर्मीय शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकशाही मार्गाने राज्यघटनेच्या अधिकारात संमत करण्यात आलयं.मात्र काही देशविघातक समाजकंटकांकडून या विधयेकाच्या विरोधात आंदोलन करून शांतता भंग करण्याच काम सुरू आहे.तर विश्वविद्यालयाच्या दारात दगडफेक,जाळफोळ करून पोलिसांच्यावरही हल्ला करण्यात आलायं. त्यामुळे याच्या निषेधार्थ आणि नागरिकत्व सुधारणा विधेययकाच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आलीतं. यावेळी हिंसक आंदोलन करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी या प्रमुख मागणी अन्य मागण्या करण्यात आल्या. सदर मागणीचे निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आलयं.
दरम्यान विश्वविद्यालयाच्या आवारात एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यासाठी लागणारे दगड आणि जाळफोळ करण्यासाठी लागणारे इंधन कुठून आले?या षडयंत्रामागे कोण आहे?याची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, ज्या समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक करून जाळफोळ केली त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या आंदोलनात ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांना विद्यालयातून काढून टाकावे,या आंदोलनामागे कोणत्या हिंसक संघटनेचा हात आहे का याचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, हिंदू जनजागृती समितीचे मनोज खाडये, किरण दुसे,शिवानंद स्वामी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.