रत्नागिरी: भारतातील एक आघाडीची गृहकर्ज सुविधा देणारी कंपनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडने रत्नागिरीमध्ये गृहकर्ज प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्याची योजना सुरु केली आहे. आयसीआयसीआय होम फायनान्स शाखा – दुसरा मजला, कार्यालय क्रमांक २०२, कोहिनूर पॅरॅडाईस, सर्व्हे नंबर २८४, शिवाजी नगर, रत्नागिरी ४१५६१२ येथे २१ आणि २२ डिसेंबर २०१९ या दिवशी जाऊन तुम्ही या तात्काळ गृहकर्ज मंजुरी योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, कर परतावा आणि गेल्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट ही कागदपत्रे सोबत न्यावी लागतील. याबरोबरीनेच घर किंवा व्यवसाय विस्तारासाठी पहिल्यांदाच कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या, उत्पन्नाचे मर्यादित पुरावे असलेल्या ग्राहकांना देखील या तात्काळ कर्ज मंजुरी योजनेचे लाभ मिळू शकतील.आयसीआयसीआय होम फायनान्सतर्फे त्यांच्या गृहकर्जावर विविध प्रकारचे लाभ दिले जातात. बँक कर्मचाऱ्याने ग्राहकाच्या घरी जाऊन कर्ज प्रक्रियेची पूर्तता करण्यापासून ते कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाण्यापर्यंत विविध सुविधांचा लाभ घेऊन आयसीआयसीआय होम फायनान्सचे ग्राहक शहर सीमांच्या किंवा ग्रामपंचायत सीमांच्या आत स्वतःच्या मालकीचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. याशिवाय घर दुरुस्तीसाठी देखील आयसीआयसीआय होम फायनान्सकडून कर्ज सुविधा पुरविल्या जातात. याठिकाणी ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेचेही लाभ घेता येतात. अल्प उत्पन्न गट / आर्थिकदृष्टया दुर्बल गट आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी ही क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना आहे. यामध्ये कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त २.६७ लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकते.३ लाख रुपयांपासून ५ कोटी रुपयांची कर्जे देणाऱ्या आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये कार्यालयीन जागा घेण्यासाठी किंवा वर्तमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तारण कर्जे देखील दिली जातात.रत्नागिरीमध्ये गृहकर्जांना तात्काळ मंजुरी देण्याची योजना सुरु करत असल्याबद्दल आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. अनिरुद्ध कमानी यांनी सांगितले, “आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या मालकीचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतो. रत्नागिरीमध्ये गृहकर्जांना तात्काळ मंजुरी देण्याची योजना सुरु करून आम्ही आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत आणणाऱ्या, त्याचबरोबरीने कर्जासाठी पात्र असलेल्या ग्राहकांना गृहकर्जाची तात्काळ मंजुरी देणार आहोत. देशातील सर्वोत्तम गृहकर्ज सेवा पुरविणे, आमच्या वाढत्या ग्राहकसंख्येला डिजिटल सुविधांचे लाभ पुरविण्यासाठी आमचे देशभरातील शाखांचे नेटवर्क सदैव प्रयत्नशील असते.”