कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रेल्वे फाटक येथील भाजी मार्केट परिसरातील कोंढाळयामध्ये हॉस्पिटलमधील जैव वैद्यकिय कचरा टाकलेचे निदर्शनास आले. याबाबत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पडताळणी केली असता हा जैव वैद्यकिय कचरा हा इंदिरा आय.व्ही.एफ सेंटर या हॉस्पिटलमधून कोंढाळयामध्ये टाकल्याचे निर्दशनास आले. आरोग्य विभगाच्या आरोग्य निरीक्षक यांनी इंदिरा आय.व्ही.एफ सेंटरवर कारवाई करुन रक्कम ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सदरची कारवाई आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील, सहा.आरोग्य निरीक्षक गीता लखन आदी उपस्थित होते