कोल्हापूर /प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील घाटपुरी-खामगाव येथील सुतार समाजातील अल्पवयीन दिव्यांग मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंध युवक मंच हणबरवाडी संचलित अंध मुल-मुली वसतिगृहाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलयं.
निवेदनात म्हटले आहे की घाटकोपर ता.खामगाव जिल्हा बुलढाणा येथील आचल गजानन बगेकर (वय-१६)या दिव्यांग अल्पवयीन सुतार समाजातील मुलीवर दत्ता साठे आणि ज्ञानेश्वर तावडे या दोन नराधमांनी दि.१०डिसेंबर रोजी लग्नाचे खोटे आमिष दाखवून अज्ञात स्थळी नेवून तिच्या मानसिक दुर्बलतेचा फायदा घेऊन बलात्कार करण्यात आलायं. याची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. समाजात अशा होणाऱ्या वाईट गोष्टीवर कडक कायदा होवून कारवाई करणे आवश्यक आहे. या दिव्यांग पिडीत मुलीसाठी आज महाराष्ट्र एकत्र आला आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर होऊन दिव्यांग समुदायात संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.त्यामुळे या नराधमांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करुन पिडीत मुलीस न्याय द्यावा.
यावेळी अंध युवक मंच हणबरवाडी संचलित अंध मुल-मुली वसतिगृहाचे पदाधिकारी, अंध-अपंग विद्यार्थी उपस्थित होते.