तुझ्या मते फिटनेस म्हणजे काय?माझ्यासाठी फिटनेस ही एक जीवनशैली आहे, जी आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची बनली आहे. खासकरून आपण अधिककरून कामामध्ये व्यस्त असल्यामुळे फिटनेस अधिकच महत्त्वाचा बनला आहे. शरीर आरोग्यदायी असल्यास मन देखील आरोग्यदायी राहते. तुमचे शरीर व मन आरोग्यदायी नसेल तर तुम्ही प्रभावीपणे काम करू शकणार नाही. म्हणून आठवड्यातून किमान पाच दिवस तरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. माझ्या सोसायटीमध्ये जिम व स्विमिंग पूल आहे. म्हणून मी सोनी सबवरील मालिका ‘तेरा क्या होगा आलिया‘साठी रात्रीचे शूटिंग असताना स्वत:ला सक्रिय ठेवण्याकरिता स्विमिंगला किंवा इतर शारीरिक व्यायाम करण्यासाठी जातो.तुझा फिटनेस मंत्र काय आहे?सिक्स पॅककडे लक्ष देण्यापेक्षा शरीर तंदुरूस्त ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही करत असलेल्या फिटनेस व्यायामासह तुम्हाला स्वत:ला चांगले वाटणे गरजेचे आहे. सुंदर शरीरयष्टी बनवणे हे तात्पुरत्या काळापुरतीच असते. त्यापेक्षा तंदुरूस्त राहा आणि स्वत:ला चांगले वाटेल असा व्यायाम करा.तू तुझे मन व शरीरामध्ये आरोग्यदायी संतुलन कशाप्रकारे ठेवतोस?जिममध्ये व्यायाम करण्याव्यतिरिक्त मला योगा देखील करायला आवडतो. पण माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे सर्वकाही करणे अवघड असल्यामुळे मी दिवसातून किमान ४५ मिनिटे वेळ काढून योगा किंवा इतर शारीरिक व्यायाम करण्याची खात्री घेतो. व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीरामधील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे आपले मन देखील सक्रिय व सकारात्मक राहण्यामध्ये मदत होते.तुझा आव्हानात्मक व व्यस्त नित्यक्रम पाहता तू तंदुरूस्त राहण्यासोबत आरोग्यदायी जीवनशैली कशाप्रकारे राखतो?मी दीर्घकाळापासून अधून-मधून उपवास करत आलो आहे. यामध्ये दिवसा ८ तास खावे लागते आणि उरलेल्या १६ तासांसाठी भूकेवर नियंत्रण ठेवावे लागते. यादरम्यान शरीर अशा संघर्षमय स्थितीमध्ये जाते, की शरीरामध्ये असलेल्या कॅलरींचा वापर केला जातो. ज्यामुळे शरीरावरील चरबी कमी होते. ही प्रयत्न व चाचणी करण्यात आलेली पद्धत आहे, जी अत्यंत प्रभावी आहे. अनेक लोक या पद्धतीचा अवलंब करतात आणि वैद्यकीयदृष्ट्या देखील ही पद्धत सिद्ध झाली आहे.
