सोनी सबवरील मालिका ‘तेरा क्या होगा आलिया’ने लक्षवेधक पटकथेसह प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तारा (प्रियंका पुरोहित) आणि आलिया (अनुषा मिश्रा) यांच्यामध्ये सुरू असलेल्या प्रेमयुद्धासह मालिका आता एका रोमांचक वळणावर येत आहे, जेथे आलियाने ती गरोदर असल्याचे सांगितले आहे.
सोसायटीमधील सर्वजण काला चोर बाबत चिंताग्रस्त आहेत. आलिया व आलोकला एकमेकांपासून दूर ठेवण्याच्या ताराच्या प्रयासामुळे आलिया आलोकला भेटण्यासाठी बराच प्रयत्न करत आहे. या स्थितीवर मात करत आलोकचे लक्ष वेधून घेण्यासाठी आलिया गरोदर असण्याची बतावणी करण्याचे ठरवते. ही बातमी समजल्यानंतर आलोक नेहमी आलियाला भेटण्याचा प्रयत्न करतो आणि मुलगी व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो. आलोक जवळ आल्याने आलिया आनंदित झाली आहे, पण त्यासोबत तिला आलोकला अंधारात ठेवण्याचे आणि त्याच्या भावनांशी खेळण्याचे वाईट देखील वाटत आहे. दुसरीकडे आलोक सतत आलियाला भेटायला जात असल्याने ताराला संशय येतो आणि ती या सर्व गोष्टीची शाहनिशा करण्याचे ठरवते.
ताराला आलियाच्या गरोदरपणाच्या खोट्या बतावणीबाबत समजल्यानंतर काय घडेल?
आलियाची भूमिका साकारणारी अनुषा मिश्रा म्हणाली, ”तारा आलोक व आलियाला एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आलियाने आलोकचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक योजना आखली आहे. ती गरोदर असल्याची बतावणी करते. पण सोबतच तिला आलोकच्या भावनांशी खेळण्याचे वाईट देखील वाटत आहे. ती आलोकला सर्वकाही खरं सांगते की नाही आणि ताराला तिचे खरे सत्य समजल्यानंतर ती काय करेल, हे पाहणे प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचकारी असणार आहे.”
आलोकची भूमिका साकारणारा हर्षद अरोरा म्हणाला, ”आलोकला आलियाच्या गरोदर असण्याची बातमी समजल्याने खूप आनंद झाला आहे. तो पुन्हा एकदा वडिल बनणार आहे. पण त्याला खरं काहीच माहित नाही. आलियाच्या या खोट्या गरोदरपणाच्या बतावणीमुळे त्रिकूटामध्ये तणाव निर्माण होणार आहे, जे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असणार आहे.”
पाहत राहा ‘तेरा क्या होगा आलिया’ दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७ वाजता फक्त सोनी सबवर