कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील रस्ते , लहान पूल, गटर्स या प्रस्तावित कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी द्यावा अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री आ.अशोक चव्हाण यांच्याकडे केली .
याबाबत दिलेल्या निवेदनात आ. पाटील यांनी दक्षिण मधील करावयाच्या विविध विकासकामांची यादी दिली आहे.यामध्ये विकासवाडी, नेर्ली, तामगांव, ऊजळाईवाडी विमानतळमार्गे मुडशिंगी, वसगडे लांबोरे मळा ते राज्यमार्ग क्रं. 177 ला मिळणारा रस्ता प्रजिमा 94 कि.मी 11/700 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे, रा.मा. क्रं. 196 पासून आय.टी.आय पाचगांव, नंदगाव, बाचणी प्रमुख जिल्हा मार्ग क्रं. 30 कि.मी 14/400 ते 15/000 नंदगाव गावामध्ये काँक्रिट रस्ते व बांधीव गटर्स करणे, चंद्रे, निगवे, कावणे, दयाचे वडंगाव, कोगोली, पट्टणकोडोली प्रजिमा.89 कि.मी 25/200 मध्ये कोगील बु. गावाजवळ लहान लहान पुलाचे बांधकाम करणे, कळंबे तर्फे ठाणे, पाचगांव, भारती विद्यापीठ, कंदलगाव, कोगील ब्रदुक रस्ता प्रजिमा 95 कि.मी 0/00 ते 3/00 मध्ये आर.सी.सी गटर्स बांधणे व रस्त्याची रुंदीकरण करणे, चंद्रे, निगवे, कावणे, चुये, वडकशिवाले, हलसवडे, पट्टणकोडोली प्रजिमा 89 कि.मी 8/200 ते 10/300 रुंदीकरण व सुधारणा करणे (भाग कावणे ते वडकशिवाले), चंद्रे, निगवे, कावणे चुये, पट्टणकोडोली प्रजिमा 89 कि.मी 7/00 ते 8/00 पुल व रस्ता करणे (कावणे ते चुये),राष्ट्रीय महामार्ग क्रं. 4 नवे चिंचवाड फाटा रुकडी ते रा.मा. 200 ला मिळणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्रं. 200/00 ते 600/0 रस्ता सुधारणा करणे, चंद्रे, निगवे, कावणे, कोगील, कणेरी, नेर्ली, पट्टणकोडोली प्रजिमा 89 कि.मी 29/00 ते 30/500 मध्ये काणेरीगावाजवळ आर.सी.सी. गटर्स व लहान पुलाचे बांधकाम करणे , रा.मा.क्र. 196 पासुन आ.टी.आय. पाचगांव, नंदगाव बाचणी प्रमुख जिल्हा मार्ग क्रं. 30 कि.मी 0/000 ते 2/600 मोरी रुंदीकरण बांधीव गटर्स करणे (भाग आय.टी.आय. ते पाचगाव), कोल्हापूर रा.म. क्र. 4 जाजल पेट्रोल पंपा पासून कणेरी गिरगांव हलसवडे ते रा.म.क्र.4 कोल्हापूर शहर वळण मार्ग राज्यमार्ग क्रं. 194 राज्य मार्ग क्रं. 194 अ कि.मी 3/300 ते 3/400 कणेरी गावाजवळ नाल्यावर संरक्षण भिंत बांधणे ,कोल्हापूर शहराबाहेरील वळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रं. 4 पासून शाहू नाका कळंबे पासून शाहू नाका कळंबे, साळोखेनगर ते शाहूनाका ऊजळाईवाडी ते विमामतळ राष्ट्रीय महामार्ग क्रं.4 रस्ता राज्यमार्ग क्रं. 194 ता. करवीर कि.मी 0/200 ते 0/800, 3/500 ते 3/800 ची सुधारणा करणे, विजयदुर्ग तलेरा गगनबावडा कोल्हापूर पट्टणकोडोली हुपरी, रेंद्राळ, जंगमवाडी राज्य हद्दीपर्यंत राज्यमार्ग क्र. 177 कि.मी (चव्हाणवाडी ते करवीर तालुका हद्द रस्ता सुधारणा करणे) या कामांचा समावेश आहे .