कोल्हापूर /प्रतिनिधी
सोलापूर येथील मजरेवाडी मध्ये वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे.आरोपीचा खटला जलदगती न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा व्हावी.या बाबत कोल्हापूर जिल्हा मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयातील अफर चिटणीस संतोष कणसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस तानाजी पोवार,जिल्हा प्रमुख अर्जून देशमुख ,जिल्हा उपप्रमुख धिरज मोहिते,जिल्हा संपर्क प्रमुख दिपक शिंगाडे,जिल्हा कार्याध्यक्ष सतीश गाडी वडर,शहर प्रमुख संजय शिंगाडे,शहर उपप्रमुख तुषार मोहीते,समन्वयक प्रकाश सौंदलगेकर,इचलकरंजी शहर प्रमुख युवराज शिंगाडे,पन्हाळा तालुका प्रमुख सुरेश वडर,चिटणीस सतीश पोवार,सेक्रेटरी सचीन पोवार,बाळकृष्ण पोवार,बाबुराव नलवडे, दुर्गाप्पा पोवार यासह जिल्ह्यातील शेकडो वडार समाज बांधव उपस्थित होते.