कोल्हापूर ता. 30 : राजेंद्रनगर येथील शांती निकेतन स्कुल व मनोरमा हॉटेल मागील केटेनमेंट झोनची व सायबर कोव्हीड केंद्राची आयुक्त डाँ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी डॉ.अर्पिता खैरमोडे, विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर, सचिव निचील कांबळे, आरोग्य निरिक्षक सुशांत कावडे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त डाँ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी राजेंद्रनगर येथील केटेनमेंट झोनची पाहणी करतेवेळी मनोरमा हॉटेल मागील बाजूस केटेनमेंट झोन याठिकाणी चंद्रकांत पांडूरंग भेडे यांचे घराचे बांधकाम दहा कर्मचा-यासह सुरु असलेचे निदर्शनास आले. त्यावेळी संबधीत प्रतिबंधीत क्षेत्रातील बांधकाम मालकाकडे बांधकाम परवानगी कागदपत्राची मागणी केली असता बांधकाम परवाणगीची कागदपत्र सादर केली नाहीत. त्यामुळे आयुक्त डाँ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबधीत बांधकाम मालकास दोन हजार रुपये दंड करण्याचे आदेश विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर यांना दिले. त्याप्रमाणे चंद्रकांत पांडूरंग भेंडे यांच्यावर केटेनमेंट झोनमध्ये बांधकाम करत असलेमुळे रु. 2,000/- दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर यांनी केली.
यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीकांना बाहेर फिरु नये. सर्दी, खोकला तापाची काही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकिय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. महापालिकच्या दैनंदीन होणा-या सर्व्हेक्षणास नागरीकांनी सहकार्य करावे. कोरोनाबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, मास्कचा वापर करावा, सर्वांनी वारंवार हात स्वच्छ साबनाने धुवावे, गर्दीमध्ये जाऊ नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केलेे. तसेच आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सायबर कोव्हीड-19 केंद्रासही भेट दिली.