कोल्हापूर ता.30 :- शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये 2 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा 70 वा रविवार असून या अभियानामध्ये स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर व कार्यकर्ते, स्वच्छता दूत अमित देशपांडे व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी हॉकी स्टेडियम येथे स्वच्छता दुत अमित देशपांडे व विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर यांनी महापालिकेचे कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
तसेच स्वरा फौंडेशनच्यावतीने कसबा बावडा झूम प्रकल्प येथे ग्रीन कॉरिडॉर करण्याच्या दृष्टीने विषारी वायू शोषण करणारी 15 झाडांचे वृक्षारोपन आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पियुष हुलस्वार, अमर कुंभार, शुभम पाटील, स्वरा फौंडेशनचे सदस्य व आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे जयंती पंपिंग स्टेशन येथे स्वच्छता करुन वृक्षारोपनही करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी जयंती गार्डनची पहाणी केली. यावेळी स्वरा फौंडेशनचे सदस्य, कनिष्ठ अभियंता आर के पाटील व पाणी पुरवठा विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.
तसेच कसबा बावडा पिंजार गल्ली येथे आरोग्य निरिक्षक नंदकुमार पाटील व यश कुंभार यांच्या हस्ते वक्षारोपन करण्यात आले. यावेळी राहुल कुंभार, सर्जेराव चौगले, जयवंत कोळी, अमर वरुटे, शामराव कदम व स्वरा फौंडेशरचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदरची स्वच्छता मोहिम पंचगंगा नदी घाट व पंचगंगा स्मशान, मोहिम हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज मेनरोड, हॉकी स्टेडियम ते शेंडा पार्क, रंकाळा टॉवर ते डी मार्ट मेनरोड, जयंती नदी संप व पंप हाऊस परिसर, रंकाळा तलाव मेनरोड, रिलायन्स मॉल मागील बाजू जयंती नदी, धैर्यप्रसाद हॉल ते कावळा नाका ते मध्यवर्ती बसस्थानक, सर्किट हाऊस ते कसबा बावडा, डि.एसपी ऑफिस ते बावडा रोड, घनकचना प्रकल्प परिसर तसेच रंकाळा टॉवर मेनरोड, कळंबा फिल्टर हाऊस, मिलेक्टरी मेनरोड, क्रशर चौक ते देवकर पाणंद व सानेगुरुजी वसाहत रोड, कोटीतीर्थ तलाव परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. मेन रोड, स्वच्छता करण्यात आली. यावेळी नागरीकांना मास्कचा वापर करावा, सर्वांनी वारंवार हात स्वच्छ साबनाने धुवावे, गर्दीमध्ये जाऊ नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन स्वच्छता मोहिमेच्या वेळी करण्यात आले. या मोहिमेत 3 जेसीबी, 3 डंपर, 6 आरसी गाडया, 3 औषध फवारणी टँकरचा वापर करण्यात आला. तसेच महापालिकेच्या 50 स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने मोहिम राबविण्यात आली.
यावेळी अधिकारी, आरोग्य निरिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.