कोल्हापूर, २६ मे २०२३: भारतातील सर्वात मोठे खिडक्या आणि दरवाज्यांचे ब्रॅंड आणि या विभागाच्या बाजारामधील आघाडीचे नाव असलेल्या फेनेस्टाने आणखी एक नवीन शोरूम उघडून त्यांच्या रिटेल विस्ताराला बळकटी दिली आहे. जेपीआर फॅसिलिटीज प्रायवेट लिमिटेड हे खास शोरूम श्री. महालक्ष्मी सिरॅमिक्स, कोल्हापूर, येथे स्थित आहे आणि सर्वोत्कृष्ट दर्जाच्या अॅल्युमिनियमच्या खिडक्या व दरवाजे, यूपीव्हीसी खिडक्या व दरवाजे आणि अंतर्गत आणि डिझाईनर दरवाजे तेथे उपलब्ध आहेत.
या लॉंचसह फेनेस्टा आपल्या विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांसाठी परस्परसंवादी व माहितीपूर्ण खरेदीचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी एक अजून महत्त्वपूर्ण टप्पा रेखित करीत आहे. फेनेस्टा शोरूम्स ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि बाजारपेठेतील एक नेतृत्व म्हणून स्थान मिळवण्यासाठी यशस्वीरीत्या योगदान देत आहेत. भारतात अॅल्युमिनियमच्या खिडक्या व दरवाजे, यूपीव्हीसी खिडक्या व दरवाजे आणि अंतर्गत आणि डिझाईनर दरवाजे यांच्या श्रेणींमध्ये झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे ब्रॅंड आपला बाजारातील हिस्सा आणखी वाढवण्याचा आणि भविष्यात आपले नेतृत्व व अग्रगण्य स्थान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
हे नवीन शोरूम चालू करण्याबाबत फेनेस्टाचे व्यवसाय प्रमुख साकेत जैन म्हणाले, आमचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत छान झाला आहे आणि भविष्यातील वेगवान वाढीसाठी आम्ही तयार आहोत. टिअर -२ आणि टिअर-३ बाजारपेठांमध्ये देखील आक्रमक विपणन धोरण, उत्पादनांची विविधता आणि जलद रिटेलचा विस्तार यांचे संयोजन आम्हाला आमचे ध्येय गाठण्यात मदत करेल. आमची विपणन धोरणे अशा प्रकारे तयार केली जातात की, ती ग्राहकांसाठी प्रतिबद्धता, शिक्षण आणि एक अनुभवात्मक खरेदी अनुभव निर्माण करतात. या अनुषंगाने, आम्ही आमच्या सर्व भागीदारांचे आणि आमच्या ग्राहकांचे आमच्या यशस्वी व्यवसायातील त्यांच्या योगदानाबद्दल आणि आम्हाला पाठिंबा देण्याबद्दल आभार मानू इच्छितो.
महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील फेनेस्टा शोरूम खिडक्या, दरवाज्यांपासून ते विविध डिझाईन आणि रंगाच्या उत्पादनांचे प्रदर्शन करते. या लॉंचसह फेनेस्टा आता ३५० पेक्षा जास्त ठिकाणी आहे.
यूपीव्हीसीचे प्रोफाइल बनवण्यापासून ते अंतिम बनलेले उत्पादन बसविण्यापर्यंत तसेच विक्रीनंतरच्या सेवेपर्यंत संपूर्ण पुरवठा साखळी नियंत्रित करणारी फेनेस्टा ही भारतातील एकमेव कंपनी आहे. ग्राहकांना उत्तम अभियांत्रिकी व समकालीन शैली मिळावी यासाठी या उत्पादनांच्या विविध श्रेणी खास करून यूके आणि ऑस्ट्रियामध्ये डिझाईन केल्या आहे.
भारतातील वैविध्यपूर्ण आणि अत्यंत तीव्र हवामानात उत्तम कामगिरी करावे यासाठी फेनेस्टामधील प्रत्येक उत्पादन प्रत्येक टप्प्यावर कठोर चाचण्या आणि गुणवत्ता तपासण्यांमधून जाते. सौन्दर्य व शैलीमध्ये तडजोड न करता त्यामध्ये असणाऱ्या ध्वनीरोधक, जलरोधक (पाऊस), धूळ माती संरक्षक इत्यादी वैशिष्ठ्यांसाठी फेनेस्टाची उत्पादने देशभरातील आघाडीचे बांधकाम व्यावसायिक, इंटिरिअर डिझाईनर आणि वास्तुविशारदांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
