मदर्स डे निमित्त १४ मे रोजी दुबईमधील बुर्ज खलिफा येथील प्रतिष्ठित अरमानी हॉटेलमध्ये मदर इंडिया प्रोग्रामचा बहुप्रतिक्षित लाँच इव्हेण्ट आयोजित करण्यात आला. या इव्हेण्टला उल्लेखनीय यश मिळाले, जेथे प्रख्यात प्रतिनिधी जसे श्रीमती सबिहा शेख, ललित राज पंडित, सालेह श्वाल अल यामी व श्री. डॅन लंगविस्ट यांच्यासह भारत, यूएई, सौदी अरेबिया, युनायटेड किंग्डम व जपान येथील इतर व्यावसायिक व प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि त्यांनी मदर इंडिया प्रोग्रामप्रती व्यापक समर्थन दाखवले.
संस्थापक आणि दूरदर्शी नक्का व्यंकट राव यांनी मदर इंडिया प्रोग्रामप्रती त्यांची सखोल प्रेरणा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘हा प्रोग्राम भारतातील मातांना आमची मानवंदना आहे. प्रत्येक मातांचा सन्मान करून, त्यांना मान्यता आणि सर्वतोपरी पाठिंबा देऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आमचे ध्येय आहे.’’
लाँच इव्हेण्टने उपस्थितांचे लक्ष व उत्साह वेधून घेतला, ज्यांनी मदर इंडिया प्रोग्रामच्या परिवर्तनात्मक क्षमतेला ओळखले. इव्हेण्टमध्ये एक प्रतिनिधी अबुदुलाल अल्फाहमी आपली भावना व्यक्त करत म्हणाले, ‘‘मदर इंडिया प्रोग्राम उल्लेखनीय प्रयत्न आहे, जो मातांच्या निरंतर प्रयत्नांना प्रशंसित व सन्मानित करण्याच्या पद्धतीत क्रांतिकारी बदल घडवून आणतो.’’
या प्रोग्राममध्ये समाजातील मातांच्या बहुमूल्य भूमिका व योगदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा समावेश आहे. लक्षवेधक मदर इंडिया टीव्ही सिरीज, लक्षवेधक फोटो ब्लॉग्ज, माहितीपूर्ण बुक लाँच आणि सर्वसमावेशक पॉडकास्ट्सच्या माध्यमातून प्रोग्रामचा मातांच्या बहुआयामी जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकण्याचा मनसुबा आहे.
अपवादात्मक मातांना ओळखणे हा या उपक्रमाचा मुख्य पैलू आहे. प्रतिष्ठित मदर इंडिया अवॉर्डस्, सन्माननीय उल्लेख व रेकॉर्डसचे इव्हेण्टदरम्यान अनावरण करण्यात आले, ज्यामधून मातांनी त्यांच्या जीवनप्रवासादरम्यान दाखवलेली असाधारण समर्पितता व चिकाटी दिसून आली.
मातांना सर्वसमावेशक पाठिंबा देण्यात येईल, ज्यामध्ये आरोग्यसेवा उपक्रम, मानसिक आरोग्य आधार आणि मदर इंडिया थीम पार्क्स, महा चंडी यगम व रिक्रिएशनल सेंटर्सची स्थापना यांचा समावेश आहे. या सर्वांगीण दृष्टिकोनाचा देशभरातील मातांचा जीवनाचा दर्जा सुधारण्याचा मनसुबा आहे.
मदर इंडिया प्रोग्राम लाँच इव्हेण्टचे यश हे परिवर्तनात्मक प्रवासाची सुरूवात आहे. व्यक्तींना या सक्षम चळवळीमध्ये सामील होण्यासाठी, प्रोग्रामच्या परिवर्तनशील परिणामाचा अनुभव घेण्यासाठी आणि मातांच्या उल्लेखनीय प्रवासाला प्रशंसित करण्याचा भाग बनण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.
मदर इंडिया प्रोग्राम आणि त्याच्या आगामी उपक्रमांबाबत अधिक माहितीसाठी कृपया www.motherindia.foundation येथे भेट द्या.