कोल्हापूर, : लॉमेन या केवल किरण क्लोथिंग लिमिटेडच्या (केकेसीएल) अधिपत्याखालील प्रतिष्ठित मेन्स अफोर्डेबल लक्झरी फॅशन ब्रँडने आज आपल्या प्रबळ विस्तारीकरण धोरणाचा भाग म्हणून कोल्हापूर शहरामध्ये त्यांच्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन केले. ब्रँडची या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आणखी ५० आऊटलेट्स लाँच करत राज्यामधील उपस्थिती प्रबळ करण्याची योजना आहे. महाराष्ट्रातील फॅशनप्रेमी पुरूषांच्या स्मार्ट, स्टायलिश व आरामदायी पोषाख परिधान करण्याप्रती वाढत्या गरजेची पूर्तता करण्यासाठी लॉमेनने झपाट्याने विस्तार करण्याची योजना आखली आहे.
सर्वात मोठ्या व सर्वोत्तम मेन्स फॅशन स्टोअरसह शहरामध्ये प्रवेश करत लॉमेनचा ट्रेण्डी आणि इन-वोग कलेक्शन्स सादर करण्याचा मनसुबा आहे. ७०० चौरस फूटांवर पसरलेले कोल्हापूर येथील लॉमेनचे स्टोअर दर्जात्मक ट्रेडिंग डिझाइन्स आणि आधुनिक फॅब्रिक्स देते, ज्यामुळे पुरूषांच्या कॅज्चुअल व वर्क वेअरसाठी दर्जा वाढतो. प्रत्येक ग्राहकासाठी अनुकूल पोशाख असण्यासह स्टोअर परिपूर्ण वॉर्डरोब सोल्यूशन देते, ज्यामध्ये ग्राहकांसाठी दिवस व रात्रीसाठी आवश्यक असलेल्या फॅशनेबल पोशाखांचा समावेश आहे. नवीन स्टोअरमध्ये फॅशनेबल पोशाखांची श्रेणी आहे, ज्यामध्ये शॉर्ट्स, टी-शर्ट्स, जीन्स, कॅज्युअल शर्ट्स व ट्राऊजर्स, कॅज्युअल पॅण्ट्स आणि रात्रीसाठी फॅशन ट्राऊजर्स व शर्टसचा समावेश आहे.
स्टोअरमधील एैसपैस जागेमधून आधुनिक समकालीन डिझाइनसह आकर्षकता दिसून येते, ज्यामध्ये आकर्षक सजावट, उत्साहवर्धक प्रकाश आणि उत्तमरित्या प्रशिक्षित उत्साही सेल्स असोसिएट्स आहेत, जे स्टोअरमध्ये ग्राहक अनुभव अधिक उत्साहित करतात. आकर्षक सुरूवातीच्या ऑफर्सचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूरमधील लॉमेन स्टोअरला भेट नक्की दिली पाहिजे.
याप्रसंगी मत व्यक्त करत केवल किरण क्लोथिंग लि.चे संचालक श्री. दिनेश जैन म्हणाले, ”आम्हाला विशेषत: उत्साही व झपाट्याने विकसित होत असलेले शहर कोल्हापूरसह महाराष्ट्रात आमच्या तिसऱ्या स्टोअरचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. महाराष्ट्रातील झपाट्याने विकसित होणारे शहर कोल्हापूर आमचे धोरणात्मक विस्तारीकरण व विकास योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या विस्तारीकरणामधून ग्राहकांना अपवादात्मक फॅशन व विनासायास शॉपिंग अनुभव देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्ही कोल्हापूरमधील समुदायाचा भाग बनण्यास आणि लॉमेन ओळखल्या जाणाऱ्या त्याच उत्कंठा व समर्पिततेसह ग्राहकांना सेवा देण्यास उत्सुक आहोत.”
याप्रसंगी मत व्यक्त करत केवल किरण क्लोथिंग लि.चे संचालक श्री. विकास जैन म्हणाले, ”कोल्हापूरमध्ये आमच्या नवीन स्टोअरचे उद्घाटन लॉमेनसाठी उत्साहवर्धक पाऊल आहे. आम्हाला कोल्हापूरमधील फॅशनप्रेमींसाठी आमचे नवीन कलेक्शन्स आणि विशेष प्रमोशन्स सादर करण्याचा आनंद होत आहे. आमचा शॉपिंग गंतव्य निर्माण करण्याचा मनसुबा आहे, जेथे ग्राहकांना स्टाइल, दर्जा व नाविन्यतेचे परिपूर्ण संयोजन मिळू शकते. आम्हाला विश्वास आहे की, शहरामधील आमचे स्टोअर फॅशनप्रेमींसाठी आवडते गंतव्य बनेल.”
कोल्हापूरमधील लॉमेनचे नवीन स्टोअर शॉप क्र. १, तळमजला, चौथी लेन, राजारामपुरी, कोल्हापूर, महाराष्ट्र – ४१६००८ येथे स्थित आहे आणि सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरू होईल.
केकेसीएल बाबत: केवल किरण क्लोथिंग लिमिटेड (‘केकेसीएल’) या मेन्सवेअर-केंद्रित अॅपरल कंपनीचा चार दशकांहून अधिक काळाचा यशस्वी प्रवास आहे. डिझाइनिंग – मॅन्युफॅक्चुरिंग – ब्रँडिंग – रिटेलिंग यांचा समावेश असलेल्या एकीकृत कार्यसंचालनांसह कंपनी किलर, इंटीग्रिटी, लॉमेन आणि ईजीज या आपल्या ४ प्रख्यात मेन्सवेअर ब्रँड्ससह लक्ष्य ग्राहकवर्गाचे लक्ष वेधून घेण्यामध्ये यशस्वी ठरली आहे. ग्रुपने नुकतेच क्रॉससोबत धोरणात्मक सहयोगाच्या माध्यमातून विमेन्स कॅज्युअल वेअर विभागात देखील प्रवेश केला.
संपूर्ण भारतात ४८८ एक्सक्लुसिव्ह ब्रँड आऊटलेट्स व ३,००० हून अधिक एमबीओंना कव्हर करणारे ८० हून अधिक वितरक आणि राष्ट्रीय चेन स्टोअर्समध्ये उपस्थितीसह कंपनीचे भारतात व्यापक वितरण नेटवर्क आहे.
लॉमेन बाबत: १९९८ मध्ये लाँच करण्यात आलेला ब्रँड लॉमेन मेन्स कॅज्युअल वेअरची स्टायलिश श्रेणी देतो. स्टाइलची अद्वितीय भावना आणि जीवनाबाबत उत्साहवर्धक दृष्टिकोनासह तरूण पुरूषांसाठी ब्रँड म्हणून स्थित लॉमेन भारतातील कॅज्युअल फॅशन क्षेत्रात प्रख्यात नाव बनले आहे. लॉमेन विविधतेला नव्या उंचीवर घेऊन जातो, दिवसा व रात्री वापरता येतील असे वॉर्डरोब प्रदान करतो, ज्यामधून प्रत्येक पुरूष प्रत्येक प्रसंगासाठी आकर्षकरित्या पेहराव करण्याची खात्री मिळते.
लॉमेनसह स्टारप्रमाणे दिसण्यासाठी मोठा खर्च होत नाही. ब्रँडचे प्रीमियम दर्जाचे मर्चंडाइज किफायतशीर आहेत, ज्यामुळे उच्च फॅशन सर्वांसाठी उपलब्ध होते. क्रिकेट आयकॉन्सचा स्वभाव किंवा रेड-कारपेट सेलिब्रिटीजच्या ग्लॅमरमधून प्रेरित लॉमेन प्रत्येक पुरूषाच्या लुकला अधिक आकर्षक करण्यासाठी विलक्षण टूल्स देतो. लॉमेनसह भारतीय पुरूष आता सेलिब्रिटी फॅशनचे तत्त्व सहजपणे कॅप्चर करू शकतात आणि प्रत्येक प्रसंगी फॅशन स्टेटमेंट दर्शवू शकतात.