Friday, June 20, 2025
Home Mirror Kolhapur व्ही जॉन इंडियातर्फे शेविंग क्रीम आणि फोमने बनविलेल्या आशियातील पहिल्या ८ फुटी...

व्ही जॉन इंडियातर्फे शेविंग क्रीम आणि फोमने बनविलेल्या आशियातील पहिल्या ८ फुटी गणपतीचे अनावरण

13 सप्टेंबर 2024 – सर्जनशीलता, परंपरा आणि नावीन्याचा अनोखा मेळ घालत, व्ही जॉन इंडिया या पुरुषांसाठीच्या ग्रुमिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ८ फुटी गणपतीच्या आकर्षक मूर्तीचे अनावरण केले असून, ही मूर्ती पूर्णपणे शेविंग क्रीम आणि फोम वापरून बनविण्यात आली आहे. पुण्यातील ग्रँड स्ट्रीट मॉल येथे ‘व्ही जॉन गणपती’ नावाने ही मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये शेविंग क्रीम आणि फोमपासून बनविलेल्या सर्वात मोठ्या गणपतीचे अधिकृत स्थान मिळाले आहे.
दैनंदिन जीवनातील ग्रुमिंगचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या व्ही जॉन इंडियाच्या प्रयत्नांतून ही सर्जनशील मूर्ती साकारण्यात आली आहे. हुशारी, नवा आरंभ आणि यशाचे प्रतीक असलेल्या गणरायाची निवड करत व्ही जॉन ब्रँडने सेल्फ केयर व ग्रुमिंगचे महत्त्व कल्पकतेने इतरांपर्यंत पोहोचविले आहे. हा संदेश प्रभावीपणे देण्यासाठी व्ही जॉन गणपती, व्ही जॉनची अत्याधुनिक उत्पादने – व्ही जॉन प्रीमियम शेविंग क्रीम आणि व्ही जॉन स्पेशल मॉइश्चरायझिंग फॉर्म्युला- बेस्ड शेविंग फोम वापरून साकारण्यात आला आहे.
हा अशा प्रकारचा पहिलाच गणपती साकारण्यासाठी शेविंग क्रीम आणि फोमचे ३,५०० युनिट्स वापरण्यात आले असून, १५ दिवसांच्या अथक मेहनतीतून मूर्ती तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती नेत्रदीपक आमि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून, ग्रुमिंग आणि सेल्फ-केयर ही ब्रँडची तत्त्वे ठळकपणे अधोरेखित करणारी आहे.
याप्रसंगी व्ही जॉन इंडियाचे विपणन व्यवस्थापक आशुतोष चौधरी म्हणाले, ‘गणेश चतुर्थी हा भक्तीचा, नवी सुरुवात करण्याचा आणि उत्सवाचा काळ असतो. ज्याप्रकारे गणपती बाप्पांना आपल्या हृदयात महत्त्वाचे स्थान आहे, त्याप्रमाणे पर्सनल केयरलाही आयुष्यात महत्त्वाचे स्थान असायला हवे, हे आम्हाला अधोरेखित करायचे होते. व्ही जॉन गणपतीच्या माध्यमातून आम्ही परंपरा जपत ग्रुमिंगचे महत्त्व कल्पकतेनं दाखविले आहे.’
व्ही जॉन गणपतीच्या अनावरणप्रसंगी मॉलमधील ग्राहक आणि भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या या मूर्तीला मीडियामध्येही ठळक प्रसिद्धी मिळाली. यामुळे उत्सवी काळात ब्रँडचे ग्राहकांशी असलेले नाते आणखी दृढ होण्यास मदत झाली आहे.
या उपक्रमासह व्ही जॉन इंडियाने गणेश चतुर्थीचा उत्सव आणि ब्रँडचे तत्त्व यांचा यशस्वीपणे मेळ घालत परंपरा व आधुनिक मूल्यांशी सुसंगत अविस्मरणीय मार्केटिंग कॅम्पेनची निर्मिती केली आहे.

RELATED ARTICLES

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने वेळेपूर्वीच पूर्ण केला ११वा वेतन करार

२० मार्च-किर्लोस्कर समूहाच्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांनी आपला ११वा वेतन करार यशस्वीरीत्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न...

मोटोहाउस आता सांगलीमध्ये! ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर्ससह विस्तार

मोटोहाउस आणि एआर मोटर्स सांगली यांच्या भागीदारी झाली असून, ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर आता सांगलीकरांसाठी उपलब्ध. बुकिंग आणि डिलिव्हरी देखील...

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केली हिलक्स ब्लॅक एडिशन – धाडस, ताकद आणि प्रगल्भतेचे परिपूर्ण संयोजन

बंगळुरू, 8 मार्च -टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएमने आज भारतात नवीन हिलक्स ब्लॅक एडिशन सादर केली आहे. हे वाहन अशा ग्राहकांसाठी खास बनवले गेले...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने वेळेपूर्वीच पूर्ण केला ११वा वेतन करार

२० मार्च-किर्लोस्कर समूहाच्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांनी आपला ११वा वेतन करार यशस्वीरीत्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न...

मोटोहाउस आता सांगलीमध्ये! ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर्ससह विस्तार

मोटोहाउस आणि एआर मोटर्स सांगली यांच्या भागीदारी झाली असून, ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर आता सांगलीकरांसाठी उपलब्ध. बुकिंग आणि डिलिव्हरी देखील...

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केली हिलक्स ब्लॅक एडिशन – धाडस, ताकद आणि प्रगल्भतेचे परिपूर्ण संयोजन

बंगळुरू, 8 मार्च -टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएमने आज भारतात नवीन हिलक्स ब्लॅक एडिशन सादर केली आहे. हे वाहन अशा ग्राहकांसाठी खास बनवले गेले...

‘’महिला सबलीकरणाला’’ बळकटी देत ‘’टोयोटा किर्लोस्कर मोटर’’ साजरा करणार यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन

• लिंग आधारित समतोल आणि सर्वसमावेशनाची बांधिलकी केली अधिक दृढ बंगळुरू, ७ मार्च-महिला सबलीकरणाला बळकटी देत टोयोटा किर्लोस्कर मोटर २०२५ चा आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या...

Recent Comments