पहिल्या ५,००० बुकिंग्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी ३०,००० रूपयांच्या फायद्यांची घोषणा
कोल्हापूर: स्कोडा ऑटो इंडियाने भारतात ऑल-न्यू स्लाव्हिया मॉण्टे कार्लो लाँच केली आहे. स्पोर्ट थीमला अधिक पुढे घेऊन जात कंपनीने कुशक व स्लाव्हिया लाइन अपमध्ये ऑल-न्यू स्पोर्टलाइन श्रेणी देखील सादर केली आणि या कार्ससाठी उल्लेखनीय ऑफरची घोषणा केली, ज्यामुळे भारतातील ग्राहकांसाठी मूल्य व पर्याय दर्जा वाढला आहे.
या नवीन सादरीकरणांबाबत मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक श्री. पीटर जनेबा म्हणाले, ”मॉण्टे कार्लो बॅजचे ग्राहकांसोबत प्रबळ नाते आहे, ज्यामधून स्पोर्ट व यशाचा उत्साह दिसून येतो. मला सांगताना आनंद होत आहे की, आम्ही आज स्लाव्हिया मॉण्टे कार्लो लाँच केली आहे. हे लाँच युरोपबाहेर आमच्यासाठी मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात स्कोडा ब्रँड विकसित करण्याच्या आमच्या धोरणाचा भाग आहे. ही विशेष कार अद्वितीय, लक्षवेधक व स्पोर्टी आकर्षकतेचा शोध घेत असलेल्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल, ज्यामधून स्टाइलचा अद्वितीय अनुभव मिळेल. ही कार रॅली मॉण्टे कार्लोमध्ये आमची ११२ वर्षे, १२९ वर्षांचा संपन्न वारसा आणि भारतातील २४ वर्षांच्या कार्यसंचालनाप्रती मानवंदना आहे. आम्ही दोन नवीन ट्रिम्स ‘स्लाव्हिया स्पोर्टलाइन’ आणि ‘कुशक स्पोर्टलाइन’ देखील सादर केल्या आहेत, ज्यामधून श्रेणी विकसित व समकालीन ठेवण्यासोबत ग्राहकांना उत्तम पर्याय व मूल्य देण्याप्रती आमचा मनसुबा दिसून येतो. स्पोर्टलाइन आकर्षक दरामध्ये मॉण्टे कार्लोच्या स्पोर्टी आकर्षकतेचा शोध घेत असलेल्या ग्राहकांसाठी परिपूर्ण आहे. नवीन मॉण्टे कार्लो आणि स्पोर्टलाइन ऑफरिंग्जसह आम्ही भारतात शाश्वतपणे स्कोडा फॅमिली वाढवण्यास उत्सुक आहोत.”
अॅनिव्हर्सरी ऑफर
हे ऑल-न्यू श्रेणीचे लाँच रॅली मॉण्टे कार्लो येथे कंपनीच्या पदार्पणाच्या ११२व्या वर्धापन दिनाला साजरे करत असताना स्कोडा ऑटो इंडिया कुशक व स्लाव्हियाच्या स्पोर्ट-प्रेरित मॉण्टे कार्लो आणि स्पोर्टलाइन श्रेणीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अद्वितीय फायदे देणार आहे. या चार कार्सपैकी कोणत्याही कारची बुकिंग करणाऱ्या पहिल्या ५,००० ग्राहकांना ३०,००० रूपयांचे फायदे मिळतील. ही ऑफर त्वरित सुरू होईल आणि ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत वैध असेल.
मॉण्टे कार्लोचे इंटीरिअर
आतील बाजूस, कारच्या ऑल-ब्लॅक स्पोर्टी केबिनमध्ये मॉण्टे कार्लो रेड थीम इंटीरिअर आहे. डेकॉर फ्रेम, एअर व्हेण्ट्स ब्लॅक रंगामध्ये आहेत. तसेच लोअर डॅशबोर्ड, सेंटर कन्सोल डेकॉर आणि हँडब्रेक पुश बटन देखील ब्लॅक रंगामध्ये आहेत. स्टीअरिंग व्हील आणि गिअर नॉबमधील क्रोम इन्सर्ट्स ब्लॅक रंगासह बदलण्यात आले आहेत. डार्क, स्पोर्टी थीम स्कोडा ऑटोच्या रॅली वारसानुसार आहे, जेथे इंटीरिअर आणि हँडल्सना गडद रंग देण्यात आला आहे.
स्पोर्टलाइन
स्कोडा ऑटो इंडियान दोन सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कोडा कार्समध्ये स्पोर्टलाइनचे पदार्पण करत कुशक आणि स्लाव्हिया श्रेणी देखील विस्तारित केली. ग्राहक अभिप्रायाला प्राधान्य देत स्कोडा ऑटो इंडियाने आता स्पोर्टलाइन सादर केली आहे, जी कुशल व स्लाव्हियाच्या विद्यमान क्लासिक, सिग्नेचर, मॉण्टे कार्लो आणि प्रेस्टिज व्हेरिएट्समध्ये नवीन भर आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय व मूल्य मिळाले आहे.
अंतर्गत वैशिष्ट्ये
कुशक व स्लाव्हिया लाइन-अपच्या इतर व्हेरिएण्ट्सप्रमाणे स्पोर्टलाइनमध्ये देखील प्रमाणित म्हणून सहा एअरबॅग्ज येतात. तसेच, या स्पोर्टी ट्रिममध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, अलॉई फूट पेडल्स, कनेक्टिंग डॉंगल, रेन-सेन्सिंग वायपर्स आणि ऑटो-डिमिंग इंटर्नल रिअर-व्ह्यू मिररसह इतर विविध वैशिष्ट्ये आहेत.