पुणे, जानेवारी 2026: जगभरात प्रसिद्ध आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेला प्री-स्कूल शो (पी ए डब्ल्यू) पॉ पेट्रोल आता प्रथमच पुण्यात येत आहे. हा खास कार्यक्रम फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथील लिबर्टी स्क्वेअर येथे 9 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी लिबर्टी स्क्वेअर हे ठिकाण अॅडव्हेंचर बे थीमवर सजवले जाणार आहे. मुले आणि कुटुंब येथे मजेदार आणि इंटरॅक्टिव्ह अनुभवाचा आनंद घेऊ शकतील. हा उपक्रम भारतात जिओस्टारकडून सादर केला जात आहे.
हा खास कार्यक्रम लहान मुलांना त्यांच्या आवडत्या पप्पी हिरोंच्या जगात घेऊन जाणार असून, विविध अॅक्टिव्हिटी झोनमध्ये आयोजित केलेल्या मजेदार आणि थीमवर आधारित मिशन्समध्ये सहभागी होण्याची संधी देणार आहे.
प्रवेश करताच प्रत्येक मुलाला पॉ पेट्रोल पासपोर्ट आणि एक अॅक्टिव्हिटी बँड दिला जाईल. प्रत्येक अॅक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पासपोर्टवर शिक्का मारला जाईल, ज्यामुळे ते मिशन पूर्ण करण्याच्या अधिक जवळ जातील. सर्व अॅक्टिव्हिटीज पूर्ण केल्यानंतर मुलांना कम्प्लीशन सर्टिफिकेट आणि ऑफिशियल पॉ पेट्रोल गिफ्ट्स दिली जातील, ज्यामुळे हा अनुभव मुलांसाठी अधिक मजेदार, खास आणि अविस्मरणीय ठरेल.
कार्यक्रमातील खास अॅक्टिव्हिटीज
· चेससोबत केस सॉल्व्ह करा
· रबलचे कन्स्ट्रक्शन सेंटर
· मार्शलसोबत फायर फ्लाइट
· स्कायसोबत उड्डाणाचा अनुभव
· इमर्सिव्ह व्हीआर कार रेस
· आर्ट्स अँड क्राफ्ट्स झोन
· पॉ पेट्रोल स्क्रीनिंग एरिया
· पप कॅरेक्टर्ससोबत भेट आणि संवाद
· प्रोफेशनल फोटोग्राफी झोन
· अधिकृत पॉ पेट्रोल भेटवस्तू
पॉ पेट्रोल हा शो त्याच्या मनोरंजक कथाकथनासाठी ओळखला जातो. तसेच मुलांना टीमवर्क, धैर्य आणि समस्या सोडवण्याचे महत्त्व शिकवतो. हा लाईव्ह अनुभव मुलांसाठी सुरक्षित, आनंददायी आणि शिकवण देणारा आहे. येथे मुले खेळू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात आणि आपल्या कुटुंबासोबत सुंदर व कायम लक्षात राहतील अशा आठवणी तयार करू शकतात.
कार्यक्रमाची माहिती
· दिनांक: 9 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2026
· वेळ: दुपारी 2 वाजल्यापासून
· ठिकाण: लिबर्टी स्क्वेअर, फिनिक्स मार्केटसिटी पुणे
· तिकिटे: बुकमायशो वर उपलब्ध
· तिकीट दर: 399 पासून







