शिक्षण देत, सक्षमीकरण करत आणि गैरसमज दूर करत मधुमेह उपचारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सिप्लाने #InhaleTheChange मोहीम सुरू केली आहे.
[कोल्हापूर, बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या साथीने सिप्लाने #InhaleTheChange नावाचा देशव्यापी जनजागृती उपक्रम सुरू केला असून, इन्सुलिन थेरपीशी संबंधित भावनिक आणि वर्तणुकीतील अडथळ्यांवर मात करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारतासमोरील सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हानांमध्ये मधुमेहाची गणना केली जाते, मधुमेहामुळे दीर्घकालीन आजारपण आणि लक्षणीय जीवितहानी याचा सामना करावा लागतो. 10 कोटींहून अधिक भारतीय या आजाराने ग्रस्त असल्याने देशाला अनेकदा ‘जगाची मधुमेह राजधानी’ म्हटले जाते, अशा परिस्थितीत, केवळ 27.5% लोकांना त्यांच्या स्थितीची जाणीव आहे आणि फक्त 7% लोकांची रक्तातील साखर नियंत्रणात आहे, ही बाब खरोखरच चिंताजनक आहे [1], [2] या आकड्यांमुळे वैद्यकीय आव्हानांचा खडतर मार्ग तर दिसून येतोच पण त्याचसोबत भीती, सामाजिक लांच्छन किंवा आपल्या स्थितीबद्दल आणि उपलब्ध पर्यायांबद्दलच्या माहितीच्या अभावामुळे उपचारांमध्ये चालढकल करणाऱ्या किंवा उपचार बंद करणाऱ्या रुग्णांच्या दैनंदिन संघर्षांवरही प्रकाश टाकतात.
या वास्तविक जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्याची गरज अधोरेखित करताना, डॉ. निकिता ऋषी दोशी, एंडोक्राइनोलॉजिस्ट, म्हणाले:
सोपे आणि अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देताना, या चिंता ऐकून घेण्यासाठी आणि त्यांचे सुलभ निराकरण करण्यासाठी जागा निर्माण करणे आवश्यक आहे..4 #InhaleTheChange सारखे रुग्ण-केंद्रित शिक्षणाला क्लिनिकल माहितीसोबत जोडणारे जनजागृती उपक्रम उपचारांबद्दलची भीती कमी करण्यात आणि उपचारांवर विश्वास निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. खरं तर, विशेषतः मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारांमध्ये उपचारांचे पर्याय सोपे करून सांगणारा आणि ते अधिक सुलभ वाटतील असे करणारा कोणताही प्रयत्न स्वागतार्ह आहे.”
टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांसाठी आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या अनेकांसाठीच्या मधुमेह व्यवस्थापनामध्ये इन्सुलिन हा सर्वात प्रभावी उपचारांपैकी एक आहे. असे असूनही, उपचारांमध्ये सातत्य राखणे आव्हानात्मक असू शकते, आणि याचे कारण जागरूकता किंवा हेतूचा अभाव नसून, दैनंदिन व्यवस्थापनामुळे येणारा भावनिक आणि व्यावहारिक ताण हे खरे कारण आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भीती, तणाव, विसरभोळेपणा, गोंधळ आणि दैनंदिन दिनचर्या किंवा गोपनीयतेशी संबंधित अडचणींमुळे अनेकदा औषधांचे डोस चुकतात किंवा उशिरा घेतले जातात. [3] , [4] ह्या अडथळ्यांमुळे काळजीच्या दृष्टिकोनाची गरज अधोरेखित होते, हा दृष्टिकोन केवळ क्लिनिकल परिणामांपुरते मर्यादित न राहता रुग्णाचा अनुभव, स्वीकारार्हता आणि जीवनाची गुणवत्ता याचाही विचार करतो. #InhaleTheChange च्या माध्यमातून, सिप्ला या आव्हानांकडे लक्ष वेधण्याचा आणि रुग्णांच्या निवडीला व आत्मविश्वासाला पाठिंबा देणाऱ्या, माहितीपूर्ण व लांछनमुक्त संवाद साधण्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे.







