भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय, जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेवून केली कामांची आखणी

भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेतली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी, सदस्य नोंदणी केली जाणार आहे. तसेच नजीकच्या काळातील विविध उपक्रमांची आखणी करून, पक्षीय कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले.
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची निवड झाली आहे. कृष्णराज महाडिक यांनी आपल्या पक्षाच्या कामकाजाला प्रारंभ केला. कोल्हापुरातील भाजप कार्यालयात कृष्णराज यांनी भाजप युवा मोर्चाची जिल्हा स्तरीय बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष विश्‍वजीत पवार, प्रशांत घुगले, रविश पाटील-कौलवकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी येत्या काही दिवसात, युवा मोर्चाच्या वतीने राबवण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये युवा मोर्चाची कार्यकारिणी आणि संघटनात्मक बांधणी बळकट करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. शिस्तबध्द पक्ष या भाजपच्या प्रतिमेला तडा जाता कामा नये, असे सांगून राज्यात किमान एक लाख युवा सदस्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये १५ ते २० हजार सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट कोल्हापूर जिल्हयाला देण्यात आले. युवतींसाठी युवा मोर्चाचा स्वतंत्र विभाग सुरू करावा, रोजगार आणि क्रीडा कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा, अशा त्यांनी सुचना केल्या. तसेच येत्या मे महिन्यात युवा आघाडीचा राज्यस्तरीय कार्यक्रम कोल्हापुरात घेण्यात येईल. त्याचे नियोजन मार्च महिन्यापासून केले जाईल, असे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्‍वजित पवार यांनी सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट पूर्ण केले जाईल, असा शब्द प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना दिला. विरोधकांकडून नेहमीच केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात खोटे नरेटीव्ह सेट केले जाते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत भुगले यांनी दिला. नूतन युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात युवा शाखा उघडण्यात येतील. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष रविश पाटील-कौलवकर यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीमुळे कार्यकर्ते-पदाधिकारी चार्ज झाल्याचे दिसून आले. यावेळी वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, विवेक राजवर्धन यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते

  • Related Posts

    गोकुला एज्युकेशन फाउंडेशन (मेडिकल) तर्फे एआय, एरोस्पेस आणि भविष्याभिमुख कौशल्यांवर केंद्रित अशा जागतिक स्तरावर संरेखित STEM आणि व्यवस्थापन विद्यापीठ RISM ची स्थापना

    बंगळुरू, 29 एप्रिल 2026: शिक्षण क्षेत्र आणि प्रत्यक्ष वास्तव जगातील व्यवहार्यता तसेच भविष्यकालीन कौशल्यांमधील दरी भरून काढण्यासाठी गोकुला एज्युकेशन फाउंडेशन (मेडिकल)ने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. रामय्या युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड…

    ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर 2025 भारतभर भव्य आणि नाविन्यपूर्ण फॅशन शोसह झाला संपन्न

    हा दौरा तीन शहरांमध्ये यशस्वीपणे पार पडला असून, इमर्सिव्ह कथाकथन आणि अत्याधुनिक डिझाइनच्या माध्यमातून फॅशन अनुभवांना नव्याने परिभाषित करण्यात आला. ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर 2025 चा भव्य आणि लक्षवेधी प्रवास…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NEET 2026 मध्ये फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; AIR 55 सह अनेकांनी मिळवले यश

    NEET 2026 मध्ये फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; AIR 55 सह अनेकांनी मिळवले यश

    व्होक्सवॅगन इंडियाचे महाराष्ट्रातील नेटवर्क विस्तारले; छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन डीलरशिपचे उद्घाटन

    व्होक्सवॅगन इंडियाचे महाराष्ट्रातील नेटवर्क विस्तारले; छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन डीलरशिपचे उद्घाटन
    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स ची नवी शॉर्ट फिल्म ‘द गोधडी इफेक्ट’.

    ऑल न्यू निसान टेक्टॉनचे जागतिक अनावरण: अद्वितीयत्वाचा गौरव

    ऑल न्यू निसान टेक्टॉनचे जागतिक अनावरण: अद्वितीयत्वाचा गौरव

    जेन झी आणि भारत अन्न व्यापाराची पुनर्व्याख्या करत असल्याने फ्लिपकार्टच्या अन्न आणि पोषण क्षेत्रात ५०% वाढ

    जेन झी आणि भारत अन्न व्यापाराची पुनर्व्याख्या करत असल्याने फ्लिपकार्टच्या अन्न आणि पोषण क्षेत्रात ५०% वाढ
    स्कोडा ऑटो इंडियाची २०२६ च्या पहिल्या सहामाहीत विक्रमी कामगिरी