कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडियाने नवीन स्लावियाच्या किंमती जाहीर केल्या असून, तिच्या डिलिव्हरीला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. नवीन स्लाविया युरोपियन डिझाइन, दमदार कामगिरी, आधुनिक तंत्रज्ञान, आराम आणि सुरक्षितता यांचा संगम आहे. भारतासाठी विशेष विकसित एमक्यूबी-एओ-आयएन प्लॅटफॉर्मवर आधारित ही सेडान सहा ट्रिम्समध्ये उपलब्ध असून, तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९.९९ लाख रुपये आहे.
क्लासिक, क्लासिक+, सिग्नेचर, स्पोर्टलाइन, प्रेस्टीज आणि मोंटे कार्लो अशा सहा ट्रिम्समध्ये स्लाविया उपलब्ध आहे. १.० टीएसआय इंजिनसोबत सहा-स्पीड मॅन्युअल आणि नवीन आठ-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक, तर १.५ टीएसआयसोबत सात-स्पीड डीएसजीचा पर्याय देण्यात आला आहे.
नवीन स्लावियामध्ये एलईडी हेडलॅम्प्स व टेललॅम्प्स, क्रमवार टर्न इंडिकेटर्स, नवीन अलॉय व्हील्स आणि सुधारित फ्रंट-रिअर डिझाइन देण्यात आले आहे. मोंटे कार्लोमध्ये लाल अॅक्सेंट्स आणि काळे बाह्य घटक आहेत. आर्क्टिक सिल्व्हर आणि कॅपुचिनो बेज हे दोन नवीन रंगही उपलब्ध झाले आहेत.
ग्राहकांना चार वर्षे/१ लाख किमी वॉरंटी, चार वर्षांची रोडसाइड असिस्टन्स आणि चार मोफत लेबर सर्व्हिसेस मिळणार आहेत. वॉरंटी सहा वर्षांपर्यंत वाढवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.






