यामाहा म्युझिक इंडिया कडून ए आर . रहमान यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा

एआय मानवी अनुभवाची जागा घेऊ शकत नाही” – ए . आर
. रहमान
मुंबई, :संगीत क्षेत्रात होत असलेल्या वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वाढता प्रभाव लक्षात घेता, ए . आर . रहमान यांनी मानवी अनुभवाचे महत्त्व अधोरेखित केले. “एआय मानवी अनुभवाची जागा घेऊ शकत नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
यामाहा म्युजिक इंडिया प्रा . लि
यांनी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात, लेखिका आणि ज्येष्ठ चित्रपट पत्रकार राणा सिद्दीक जमाना यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रहमान यांनी ही भूमिका मांडली.
रहमान म्हणाले, “सोशल मीडियावर जे काही येते — गाणे असो किंवा वाद्य वादन — ते डिजिटल अनुभव असतो, तर प्रत्यक्ष मंचावरचा अनुभव हा खरा आणि मानवी असतो. आज डिजिटल संगीताची संख्या वाढत असली, तरीही लाइव्ह कॉन्सर्ट्सचे आकर्षण वाढत आहे. लोकांना प्रत्यक्ष अनुभव अधिक जवळचा वाटतो, त्यामुळे बहुतेक कॉन्सर्ट्स हाऊसफुल होत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “मेटा-कॉयरसारख्या संकल्पना आणि कँडल लाइट कॉन्सर्ट्स लोकप्रिय होत असल्या, तरी एआय स्वतः स्टेजवर जाऊन परफॉर्म करू शकत नाही—हेच मानवी अनुभवाचे वैशिष्ट्य आहे.”
कार्यक्रमादरम्यान, यामाहा म्युजिक इंडिया प्रा . लि . चे व्यवस्थापकीय संचालक यमॅमोटो टाकेतोषी यांनी भारतातील संगीतप्रेमींसाठी कंपनीच्या आगामी योजनांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “संगीत हे यामाहाच्या तत्त्वज्ञानाचे केंद्र आहे. भारताची समृद्ध संगीत परंपरा जागतिक स्तरावर पोहोचावी यासाठी ‘मेड इन इंडिया’ उपक्रमाद्वारे आम्ही प्रयत्नशील आहोत. ए . आर रहमान यांच्यासोबतचे सहकार्य पुढील पिढीतील कलाकारांना प्रेरणा देईल.”
या उपक्रमामुळे दर्जेदार वाद्ये अधिक सुलभ होत असून, त्याचा फायदा भारतातील तरुण प्रतिभांना होत आहे. रहमान यांच्या के एम म्युजिक कॉन्सर्वां्टोरी आणि ‘द सनशाईन ऑर्केस्ट्रा’सारख्या उपक्रमांद्वारे संगीत शिक्षणालाही चालना मिळत आहे.
शेवटी, ए आर . रहमान यांनी सांगितले, “जर आपण तरुण कलाकारांना योग्य मार्गदर्शन दिले आणि संगीत शिक्षण अधिक मजबूत केले, तर भारतीय संगीतकार जागतिक स्तरावर नेतृत्व करू शकतील.”

  • Related Posts

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    राष्ट्रीय, 9 ऑक्टोबर 2026: एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते; ज्यावरचा विश्वास त्याने एकदा गमावला होता. अशास्थितीत नेमके काय घडते? आनंद दिलीप…

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    कोल्हापूर : आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजअंतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने ‘बाप्पाचा मान’ या उपक्रमातून कोल्हापूरमधील गणेशोत्सवाच्या सर्जनशीलतेचा आणि सामुदायिक सहभागाचा गौरव केला. या उपक्रमाला शहरातील हाउसिंग सोसायट्यांकडून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार