देशव्यापी मोहिमेद्वारे एलपीजी (LPG) गॅसचा पुरवठा आता सुरक्षित; ग्राहकांसाठी शासनाचा पुढाकार

एलपीजीचा साठा करणे आणि त्यासंदर्भातील काळाबाजार कायमस्वरुपी बंद व्हावा या हेतून शासनाने अंमलबजावणी यंत्रणा अधिक बळकट केली आहे. देशातील प्रत्येक ग्राहकाला स्वयंपाकाच्या इंधनाचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी शासन कठीबद्ध आहे. सुनियोजित काम आणि सुरळीत पुरवठा याकडे शासनाचा अधिक भर आहे.
सुनियोजित आणि शिस्तबध्द कामाचा भाग म्हणून, २,७०० हून अधिक तपासण्या आणि छापे टाकण्यात आले. काळाबाजार, घरगुती एलपीजीचा गैरवापर रोखणे आणि वितरण पद्धतीमध्ये पारदर्शकता वाढवणे हा या कारवाई मागील महत्त्वाचा उद्देश आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) एलपीजी वितरकांकडे अचानक तपासणी केली. तसेच कामाचे नियोजन लक्षात घेत सुरक्षा सुव्यवस्था अधिक सक्षम केली आहे. या कडक तपासणीनंतर, २१९ वितरकांवर दंड आकारण्यात आला आहे. तसेच कायद्यानुसार तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत आतापर्यंत ५६ वितरकांना निलंबित करण्यात आले आहे.
याबरोबरच, तेल विपणन कंपन्यांनी एलपीजीच्या जबाबदार वापराला चालना देण्यासाठी आणि प्रत्येक ग्राहकाला इंधनाचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून ग्राहक संपर्क आणि जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये सुमारे ३,३०० जागरूकता शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलेंडर उपलब्धतेवर आणि वापरावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान ३५,८०० हून अधिक सिलेंडरची विक्री झाली. ग्राहक जागरूकतेच्या या उपक्रमामुळे स्थलांतरित आणि गरजू ग्राहकांच्या इंधन पुरवठा गरजा पूर्ण होण्यास मदत होत आहे. दरम्यान घरगुती एलपीजी पुरवठ्यावरील ताण कमी होत आहे.
देशाची एलपीजी वितरण व्यवस्था बळकट असल्यामुळे अंमलबजावणी आणि जनजागृतीचे उपक्रम राबवणे शक्य झाले आहे. घरगुती इंधन पुरवठा स्थिर असून, वितरकांकडे कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचेही समोर आले आहे. ११ एप्रिल २०२६ रोजी देशभर ५२.३ लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलेंडर वितरित करण्यात आले. जागतिक पातळीवरील परिस्थिती बदलत असतानाही सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी यंत्रणा सक्षम आहे.
शासन इंधन पुरवठा यंत्रणेमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करत आहे. याच दृष्टिकोनामधून ग्राहकांचे रक्षण करणे, गॅस वितरण यंत्रणा सुरक्षित ठेवणे आणि प्रत्येकाला हक्काचे ऊर्जा संसाधन मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

  • Related Posts

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    राष्ट्रीय, 9 ऑक्टोबर 2026: एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते; ज्यावरचा विश्वास त्याने एकदा गमावला होता. अशास्थितीत नेमके काय घडते? आनंद दिलीप…

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    कोल्हापूर : आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजअंतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने ‘बाप्पाचा मान’ या उपक्रमातून कोल्हापूरमधील गणेशोत्सवाच्या सर्जनशीलतेचा आणि सामुदायिक सहभागाचा गौरव केला. या उपक्रमाला शहरातील हाउसिंग सोसायट्यांकडून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार