रोटरी क्लब ऑफ होरायझन, कोल्हापूर अध्यक्षपदी – रो. सागर विलास बकरे यांची नियुक्ती

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ होरायझन, कोल्हापूरचा १८ वा चार्टर डे सेलिब्रेशन आणि १९ वा पदग्रहण सोहळा रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदाची सूत्रे रो. सागर विलास बकरे यांनी स्वीकारली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी DGR रो. अमित माटे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान Presiding Officer तथा Past President रो. देवराज नाईक-निंबाळकर यांनी भूषविले. यावेळी Assistant Governor रो. संजय साळोखे, Assistant Governor रो. डॉ. मेघराज चुघ, Installing Officer तथा Past President रो. सदानंद कोठावळे, विद्यमान अध्यक्ष रो. सी.ए. सुमित बिरंजे, सचिव रो. अभिनंदन वणकुद्रे, कोषाध्यक्ष रो. आर्की. श्रीधर काळभैरव, तसेच सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी DGN रो. विक्रांतसिंह कदम, DGND रो. सुहास जोशी, रो. अमरदीप पाटील, Assistant Governor रो. ऍड. अभयसिंह बिचकर, होरायझन क्लबचे सर्व माजी अध्यक्ष, चार्टर सदस्य, कोल्हापूर रोटरी मुव्हमेंटच्या विविध क्लबचे पदाधिकारी व सदस्य, RCC Coordinator श्री. अजित तांबेकर, मान्यवर पाहुणे, रोटरी ऍन्स, ऍनेट्स, नव्याने दाखल झालेले सदस्य आणि सदस्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी रोटरीच्या प्रथेप्रमाणे राष्ट्रगीत, व फोर-वे टेस्टने कार्यक्रमाची सुरुवात झाली. चार्टर डे निमित्त क्लबच्या अठरा वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला. सेक्रेटरी अभिनंदन वणकुद्रे यांनी सेक्रेटरीयल रिपोर्ट सादर केला तर अध्यक्ष रो. सी.ए. सुमित बिरंजे यांनी आपल्या कार्यकाळातील विविध सेवा प्रकल्प, सामाजिक उपक्रम आणि सदस्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चार्टर डे निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत केक कटिंग करण्यात आला.
यानंतर पदग्रहण समारंभात Installing Officer रो. सदानंद कोठावळे यांच्या हस्ते रो. सागर विलास बकरे यांनी प्रेसिडेंट पदाची, रो. प्रमोद सूर्यवंशी यांनी सेक्रेटरी पदाची तर रो. पवन रोचलाणी यांनी ट्रेझरर पदाची तसेच नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनीही पदाची सूत्रे स्वीकारली.
नवनिर्वाचित अध्यक्ष रो. सागर बकरे यांनी आपल्या मनोगतात आगामी वर्षासाठी सेवा, सदस्यवृद्धी, युवा विकास, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक प्रतिमा आणि समाजोपयोगी प्रकल्पांवर भर देणार असल्याचे सांगितले. रोटरीच्या माध्यमातून अधिक व्यापक सेवा कार्य उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत आगामी वर्षासाठी मार्गदर्शन केले.
दरम्यान जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांना मानद सदस्य म्हणून तर श्री. सुहास शेलार यांना नियमित सदस्य नवनिर्वाचित अध्यक्ष रो. सागर विलास बकरे यांच्या हस्ते त्यांचे इंडक्शन करून उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने त्यांचे रोटरी परिवारात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कविता पाटील व पंकज पवार यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्श नवनिर्वाचित सेक्रेटरी रो. प्रमोद सूर्यवंशी यांनी केले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चार्टर डे व पदग्रहण सोहळा संस्मरणीय ठरला असे मावळते सेक्रेटरी रो. अभिनंदन वणकुद्रे यांनी सांगितले.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर