अपग्रॅड स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि एडीवायपीयूकडून एआय-केंद्रित बी.टेक प्रोग्रामची घोषणा

कोल्हापूर, : अपग्रॅड स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी (यूजीएसओटी) आणि अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी (एडीवायपीयू) यांनी चार वर्षांचा निवासी बी.टेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) प्रोग्राम सुरू करण्यासाठी धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. यूजीसी-मान्यताप्राप्त पदवीसह उद्योगाभिमुख एआय शिक्षण देणारा हा प्रोग्राम ऑगस्ट-सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
या अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयांसह बारावी उत्तीर्ण आणि किमान ५० टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी पात्र असतील. एडीवायपीयूकडून शैक्षणिक पायाभूत सुविधा व पदवी प्रदान केली जाईल, तर यूजीएसओटीकडून उद्योगाशी जोडलेले प्रशिक्षण, एआय-केंद्रित अभ्यासक्रम, लाईव्ह मेंटरशिप आणि प्रात्यक्षिक प्रकल्पांचा अनुभव दिला जाईल.
विद्यार्थ्यांना फुल स्टॅक एआय आणि क्लाउड इनोव्हेशन, एआय आणि क्वांटम कम्प्युटिंग तसेच एआय आणि जेनएआय इंजिनिअरिंग या तीन विशेष शाखांमधून निवड करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय सात सेमिस्टरचा स्टार्टअप ट्रॅक, उद्योजकता, नेतृत्व आणि व्यावसायिक कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना अपग्रॅडच्या ३,००० हून अधिक हायरिंग पार्टनर्सच्या नेटवर्कचा लाभ मिळणार असून रोजगाराच्या संधी वाढविण्यास मदत होणार आहे.
यावेळी बोलताना अजिंक्य डीवाय पाटील ग्रुपचे चेअरमन आणि एडीवायपीयूचे चान्सलर डॉ. अजिंक्य डीवाय पाटील यांनी सांगितले की, शिक्षण भविष्यातील गरजांनुसार बदलणे आवश्यक असून हा सहयोग शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योगातील उपयुक्तता यांचा संगम घडवून आणणार आहे.
अपग्रॅड स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे सीईओ विश्वा मोहन यांनी सांगितले की, उद्योगाच्या गरजांशी सुसंगत इंजिनिअरिंग शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच रोजगारक्षम कौशल्येही प्राप्त होतील.
भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंग पदवीधर तयार होत असले तरी एआय, क्लाउड कम्प्युटिंग आणि प्रगत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रातील कौशल्यांची कमतरता जाणवत आहे. ही दरी कमी करण्यासाठी उद्योगाभिमुख आणि एआय-फर्स्ट शिक्षण मॉडेल विकसित करण्याचा या सहयोगाचा उद्देश आहे.

  • Related Posts

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

    सोलापूर: मध्यम क्षमतेच्या (२५० सीसी ते ७५० सीसी) मोटरसायकल विभागातील जागतिक अग्रणी रॉयल एनफिल्डने आज २०२६ क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन सादर केली. प्रत्येक राईड अधिक सहज आणि आरामदायी बनवण्याच्या…

    एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम

    कोल्हापूर : एआय+ने नोव्हा 2 मालिकेतील नवीन नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. आकर्षक डिझाइन, कार्यक्षमता आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी यांचा संगम असलेला हा स्मार्टफोन नव्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन
    एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान