निरोगी महाराष्ट्र – सुदृढ महाराष्ट्रसाठी कार्य करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर दि :15 (जिमाका) महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था म्हणजे केवळ मंत्रालयातील फाइल्स शासन निर्णय किंवा मोठ्या रुग्णालयांच्या इमारती नाहीत तर राज्यातील सामान्य जनतेचे,कुटुंबातील बालक,बळी राजाचे आरोग्य,वृद्धांची काळजी आणि सामान्य नागरिकांचे आरोग्य जपणे याला आरोग्य व्यवस्थेने प्राधान्य दिले आहे. ‘ निरोगी महाराष्ट्र – सुदृढ महाराष्ट्र ‘ साठी आरोग्य विभाग काम करेल असा ठाम विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केला.
निमित्त होते राज्यातील महिला आरोग्य समिती (MAS) जन आरोग्य समिती (UPHC – UHWC) तसेच रुग्णकल्याण समिती (UCHC) सदस्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधत आरोग्य व्यवस्थेतील सद्यस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेण्याचे.यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले , राज्याला 1400 डॉक्टर उपलब्ध झाले असून त्यांची नियुक्ती येत्या आठवड्याभरात करण्यात येईल.त्याचबरोबर 600 डॉक्टरांसाठी आरोग्य विभागाने जाहिरात काढली आहे .तसेच सुमारे 250 दंतचिकित्सक आरोग्य सेवेसाठी उपलब्ध झाले आहेत.राज्याच्या आरोग्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही.विविध समित्यांमार्फत आज सुमारे सहा लाखांहून अधिक नागरिकांशी आरोग्य विभागाने संवाद साधला आहे. भविष्यात यामध्ये आणखीन चार लाख लोकांचा समावेश करण्यात येऊन या सर्वांकडून आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यात येईल.आरोग्य विषयक समस्यांसाठी लवकरच ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात येईल .त्याचबरोबर स्थानिक बचत गटाच्या माध्यमातून रुग्णांना सकस व पोषक आहार देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी आबिटकर यांनी आरोग्य सेवेबाबत राज्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्या .त्यावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागाने त्यांच्याबाबतीतील तक्रारीं विषयी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा तसेच सरकारी दवाखान्यातील अनुपस्थित डॉक्टरांच्या अनुषंगाने आठवड्यात एक दिवस निश्चित करून आढावा बैठक घ्यावी अशी सूचना केली.या सूचनेला पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली.या आरोग्य जनसंवादात आरोग्य विभागांतर्गंत कार्यरत असणाऱ्या कमिट्यांच्या किती मीटिंग झाल्या ? पेशंट दवाखान्यात येतात का ? डॉक्टर वेळेवर येतात का ? डॉक्टर रुग्णांची कसा संवाद साधतात ? तसेच ते रुग्णालयात उपस्थित असतात का ? यासारखे अनेक प्रश्न आरोग्यमंत्र्यांनी या आरोग्य संवादात विचारले. या संवाद कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार,सुरेश धस, राजाभाऊ तोडसा आदी सामील झाले.
राज्याला अनेक वर्षानंतर एक सक्षम आणि कर्तृत्ववान आरोग्यमंत्री लाभल्याचे सांगून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे कौतुक करूनत्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याच्या बाबतीत देशात महाराष्ट्र एक वेगळी उंची गाठेल असा विश्वास व्यक्त केला.
राज्यातील या पहिल्यावहिल्या अभिनव अशा जन आरोग्य ऑनलाईन उपक्रमात राज्यातून बीड, तुळजापूर, पालघर, धाराशिव, नंदुरबार, जालना, अमरावती, मोर्शी आदी ठिकाणांहून मोठ्या संखेने नागरिक सहभागी झाले होते.

  • Related Posts

    फंक्शनल टी चा वाढता ट्रेंड: टेटली ग्रीन टी स्लिम केअर रोजच्या वेलनेसला देत आहे नवे रूप

    रोजच्या आहारात काय खावे-प्यावे, याची निवड आजकाल लोक खूप विचारपूर्वक करत आहेत. या बदलामध्ये फंक्शनल टी म्हणजेच खास फायदे देणाऱ्या चहाचे महत्त्व खूप वाढले आहे. लोक आपली जीवनशैली सुधारण्यासाठी याचा…

    पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन

    १९४ वर्षांच्या वारशाला नवी दिशा देणाऱ्या सहाव्या पिढीतील उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास पुणे,७ ऑगस्ट २०२६: भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित सराफी व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’चा वारसा वयाच्या मध्यतिशीत स्वीकारलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निरोगी महाराष्ट्र – सुदृढ महाराष्ट्रसाठी कार्य करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

    निरोगी महाराष्ट्र – सुदृढ महाराष्ट्रसाठी कार्य करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

    फंक्शनल टी चा वाढता ट्रेंड: टेटली ग्रीन टी स्लिम केअर रोजच्या वेलनेसला देत आहे नवे रूप

    फंक्शनल टी चा वाढता ट्रेंड: टेटली ग्रीन टी स्लिम केअर रोजच्या वेलनेसला देत आहे नवे रूप

    पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन

    पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन

    आपला सेव्हिंग्जसाठी कॉस्ट टू प्रीमियम गुणोत्तर कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाची आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफला मदत

    स्वातंत्र्यदिनानिमित्त एसुसच्या लॅपटॉप्सवर तब्बल 53% पर्यंत सवलत; 16 ऑगस्टपर्यंत विशेष ऑफर्स

    स्वातंत्र्यदिनानिमित्त एसुसच्या लॅपटॉप्सवर तब्बल 53% पर्यंत सवलत; 16 ऑगस्टपर्यंत विशेष ऑफर्स