भारतातील प्रथम क्रमांकाचे फर्निचर आणि घरगुती उत्पादनांचे दालन, पेपरफ्रायने आज कोल्हापूर, महाराष्ट्र मध्ये त्यांच्या पहिल्या स्टुडिओचे उदघाटन केले . पेपरफ्राय चे उद्दीष्ट, देशात फर्निचर आणि घरगुती उत्पादनांच्या श्रेणीमध्ये सर्वात मोठा ओमनी चॅनेल व्यवसाय तसेच विशिष्ट बाजारात प्रवेश करण्याचे आहे. २०१४ मध्ये पहिला स्टुडिओ सुरू केल्यानंतर, ५.५ वर्षांच्या अल्प कालावधीत संस्थेने २४ शहरांमध्ये ६७ स्टुडिओसह (मालकीचे आणि फ्रेंचाइझी) त्यांचा ऑफलाइन फूटप्रिंटचा देखील झपाट्याने विस्तार केला आहे. पेपरफ्राय चे दुसरे सर्वात मोठे बाजार असलेले तसेच एकूण व्यवसायातील २५ टक्के योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील, मुंबई आणि पुणे मध्ये एकूण २१ स्टुडिओ आहेत.श्री अजिंक्य कोरे यांच्या सोबत भागीदारी करत नवीन शाहुपुरी या मुख्य स्थानावर १२१० चौरस फूट क्षेत्रात नवीन फ्रँचायझी स्टुडिओ स्थापन करण्यात आला आहे,जिथे कोल्हापूरच्या ग्राहकांना अफाट कॅटलॉग,अत्याधुनिक डिझाईन्स आणि उत्पादनांची उत्कृष्ट गुणवत्ता अनुभवता येईल जे खरेदीसाठी पेपरफ्रायच्या वेबसाईटवर पण उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त ग्राहक त्यांचे आयडियल घरे बनविण्यासाठी डिजाईन एक्सपर्ट कडून विनामूल्य मदत घेऊ शकतील.टियर २ आणि टियर ३ शहरात स्वतःची उपस्थिती वाढविण्याच्या उद्देशाने पेपरफ्राय ने २०१७ मध्ये त्यांची पहिली फ्रँचायझी सुरु केली त्यांनतर इतर बाजारपेठ जसे त्रिवेंद्रम, पटना, बेंगलुरू, इंदोर, कोयंबटूर, हुबळी, म्हैसूर, गोवा आणि आता कोल्हापूरमध्ये स्टुडिओ सुरू केले. या फ्रँचायझी स्टुडिओसाठी, ब्रँडने हायपरलोकल डिमांड सायकल आणि ट्रेंडची समज असलेल्या,स्थापित आणि स्थानिक उद्योजकांचे सहकार्य घेतले आहे. अद्वितीय आणि अपार क्षमता असलेले कंपनीचे फ्रँचायझी मॉडेल हा एक उपक्रम असून जुन्या आणि संभाव्य फ्रँचायझी भागीदारांसाठी फायदेशीर आहे. हे मॉडेल १००% किंमतीच्या समतेवर आधारित आहे ज्यामध्ये परस्पर फायदेशीर बिजनेस असोसिएशन बनविण्यासाठी भागीदारास उत्पादनाची यादी ठेवण्याची आवश्यकता नसते. पेपरफ्राय एक बक्षीस रचना देखील प्रदान करते ज्यामध्ये फ्रँचायझी मालकांना फ्रँचायझी स्टुडिओद्वारे केलेल्या प्रत्येक ऑनलाइन व्यवहारावर कमिशन मिळवून फायदा होऊ शकतो.स्टुडिओ,५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत पेपरफ्राय च्या एकूण व्यवसायात सरासरी ३०% पेक्षा जास्त योगदान देत मुख्य कंझ्युमर म्हणून विकसित झाले आहे.या उदघाटन बद्दल बोलतांना अमृता गुप्ता, हेड-स्ट्रेटेजिक अलायन्सेस,पार्टनरशिप अँड फ्रँचायझी एक्सपान्शन,पेपरफ्राय म्हणाल्या की,“महाराष्ट्रात २१ स्टुडिओ लाँच केल्यानंतर श्री. अजिंक्य कोरे यांच्या सोबत भागीदारी करत कोल्हापुरात आमचा पहिला स्टुडिओ सुरू झाल्याचा आम्हाला आनंद आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून कोल्हापूरमधील आमच्या ग्राहकांना सहज प्रवेश मिळवून देणे आणि आमच्या विस्तृत-वैविध्यपूर्ण डिझाइन उत्पादनांच्या पोर्टफोलिओचा अनुभव प्रदान करणे तसेच ग्राहकांना सुंदर घरे तयार करण्यासाठी मदत म्हणून तज्ञांद्वारे सल्ला देणे ज्यामध्ये त्यांचे व्यक्तिमत्व आणि शैली प्रतिबिंबित होईल,हा आमचा हेतू आहे. ग्राहकांना शक्य तितक्या टच पॉईंट्स द्वारे उत्कृष्ट किंमत आणि विविधता प्रदान करणे हा पेपर फ्रायद्वारे आमचा हेतू आहे.श्री.अजिंक्य कोरे फ्रँचायझी पार्टनर म्हणाले की,“भारतातील अग्रणी होम आणि फर्निचर दालन सोबत भागीदारी करण्याबद्दल आम्हाला आनंद आहे. पेपरफ्राय ने खरोखरच भिन्न ओमनी चॅनेल व्यवसायासाठी पुढाकार घेतला आहे,तसेच सर्वात मोठे ओमनी चॅनेल होम आणि फर्निचर व्यवसाय तयार करण्यासाठी त्यांच्या प्रवासात भाग घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”