कोल्हापूर :- संत गाडगे महाराज यांच्या 63 व्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज जोतिबा रोड येथील त्यांच्या पुतळयास महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजीरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहण्यात आली.
यावेळी नगरसेवक ईʉार परमार, अशोक जाधव, माजी नगरसेवक आदील फरास, परिट समाजाचे अध्यक्ष दिपक लिंगम, उपाध्यक्ष प्रकाश भालकर, कार्यकारी सचिव उमेश बुधले, विʉास्त महेशकुमार खडके, अनिल खडके, समाज बांधव दिपक भालकर, संदिप भालकर, वसंतराव वठारकर, राजेंद्र यादव, दशरथ लोखंडे, सुनिल परिट, गजानन लिंगम आदी उपस्थित होते. तसेच परिट समाजाच्यावतीने झुणका भाकरी वाटप करण्यात आली.