कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे विकास परवानगीसाठी दाखल झालेल्या प्रकरणातील प्रलंबित असलेल्या विकास परवानगी कामी दि.20/12/2019 रोजी जाहीर प्रसिध्दीकरणानुसार दि.24/12/2019 रोजी नगररचना विभागामार्फत विविध प्रकारचे प्रलंबित भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजन इ. कामाकरीता नगररचना कार्यालयामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कॅम्पचे आयोजन केले होते.
दिनांक 24/12/2019 रोजीच्या आयोजीत केलेल्या कॅम्पसाठी 41 अर्ज प्राप्त झाले व समक्ष येऊन नागरीकांनी प्रकरणे सादर केली असता त्या अर्जासहित नगररचना विभागामार्फत आज 230 प्रकरणांची छाननी करणेत आली व 204 प्रकरणात निर्णय घेण्यात आले त्यामध्ये बांधकाम परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, जोता पातळी तपासणी, बांधकाम परवानगी मुदतवाढ, रेखांकन मंजुरी, टिडीआर जनरेशन/ युटिलायझेशन अश्या प्रकरणांचा समावेश होता.
सदर कॅम्पला नागरकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून कॅम्पमध्ये सहाय्यक संचालक नगररचना प्रसाद गायकवाड, उपशहर रचनाकार नारायण भोसले, एन.एस.पाटील व कनिष्ठ अभियंता सुरेश पा. पाटील, सुरेश वि. पाटील, रमेश कांबळे, हेमंत जाधव, प्रिया पाटील, मुयरी पटवेगार, उमेश बागुल, विवेक चव्हाण, सुदर्शन गाडळकर यांनी नागरीकांची कामे तपासून सादर केली. तसेच नागरिक व वास्तुशिल्पी यांचेकडून कॅम्पला मोठा प्रतिसाद मिळाला, नियोजनबध्दरित्या कॅम्पचे कामकाज पार पडले. येथून पुढे नगररचना कार्यालयामार्फत विकास परवानगी प्रलंबीत प्रकरणे कामी झिरो पेन्डसी होईतोपर्यंत अशाप्रकारे कॅम्पचे आयोजन करणेचे नियोजन करणेत येणार आहे.