सोनी सबवरील रोमँटिक विनोदी मालिका ‘जीजाजी छत पर हैं‘ प्रेक्षकांची लाडकी ईलायचीला (हिबा नवाब) पूर्णत: नवीन रूपात सादर करणार आहे. हसवून-हसवून लोटपोट करणा-या या विनोदी मालिकेमध्ये ईलायचीचे आणखी एक वेषांतर ‘लाजवंती‘ पाहायला मिळणार आहे. ती अनोख्या विनोदी पद्धतीने आणि ‘नया सुरीअल अंदाज‘सह प्रेक्षकांना मोहून टाकण्यास सज्ज आहे. महत्त्वाकांक्षी गायक पंचम (निखिल खुराणा) नेहमीप्रमाणे आंघोळ करत असताना गाणी गात असतो. खसोटे (सुमित अरोरा) पंचमचे गाणे ऐकून त्याला दुबईमध्ये न्यू इअर कॉन्सर्टमध्ये गाण्याची ऑफर देतो. पण त्याच्यासमोर एक अट ठेवतो की, परफॉर्मन्सदरम्यान त्याच्यासोबत त्याची जोडीदार म्हणून गायिका देखील असली पाहिजे. ईलायची या संधीचा फायदा घेत पंचमला त्याचा जोडीदार बनवण्याची विनंती करते. पण पंचम नकार देतो.ईलायची आणि तिचा जिद्दी स्वभाव हार मानत नाही. ती एक योजना आखते. ईलायची पंचमचे मन जिंकण्यासाठी आणि नववर्ष स्वागतादरम्यान पंचमसोबत दुबईला जाण्याची संधी मिळवण्यासाठी सुनिताची (राशी बावा) मोलकरीण लाजवंतीचा वेष घेते. ईलायची लाजवंतीच्या रूपात पंचमच्या मनामध्ये मधुरमय नाते निर्माण करण्यामध्ये यशस्वी होईल का?