कोल्हापूर:कोल्हापूरकरांच्या सर्वात आवडीच्या फॅशन ब्रँडचा बहुप्रतिक्षीत सेल लवकरच सुरु होतोय. भारतातील पसंतीचे फॅशन डेस्टिनेशन म्हणून नावाजल्या जाणाऱ्या, टाटा समूहाच्या वेस्टसाईडचा एन्ड ऑफ सिझन सेल सर्व स्टोअर्समध्ये सुरु होतोय. कोल्हापुरातील कवळा नाका येथील स्टोअरमध्ये हा आजवरचा दुसरा एन्ड ऑफ सीजन सेल असणार आहे. या सेलमध्ये कपडे, पादत्राणे, ऍक्सेसरीज व कॉस्मेटिक्सवर ६०% पर्यंतची सूट मिळणार आहे. १ जानेवारी २०२० रोजी सुरु होत असलेला हा सेल जानेवारी अखेरपर्यंत सुरु राहील.
आधुनिक पद्धतीच्या कपड्यांची आवड असणाऱ्या मुली स्त्रियांसाठी वेस्टसाईडमध्ये खास डिझाईन करण्यात आलेले अनेक प्रकारचे कपडे याठिकाणी आहेत. वॉर्डरोबचे नाईन टू नाईन कलेक्शन, आत्मविश्वास मिळवून देणारे कॅज्युअल एलओव्ही, तरुणाईचे आवडते, आधुनिक पद्धतीचे न्यूऑन, सॅस्सी सोडा, स्टायलिश कर्व्ही स्त्रियांसाठी जिया, परफॉर्मन्स फॅब्रिक्समध्ये बनवलेले फिटनेस वेअर स्टुडिओ फिट, स्वतःची खास फॅशन तयार करता येईल असे वंडरलव्ह, वर्कचे सणासुदीच्या कपड्यांचे, नक्षीकारीचे कलेक्शन, बोहेमियन प्रिंट्स व उत्तम प्रतीचे सिल्हउट्स असलेले बॉम्बे पेसले, सर्वोत्तम सिल्कचे झुबा आणि कोणत्याही प्रसंगी घालता येतील व सहज आवडतील असे उत्सा या सर्व कलेक्शन्समुळे तुम्ही विविध रंग व सिल्हटसचे कपडे निवडता येतात. फॅशन आणि ट्रेंडबद्दल विशेष चोखंदळ असलेल्या स्त्रियांची आवड याठिकाणी नक्की पूर्ण होते.
फॅशनमधील नवनवीन ट्रेंड्स उपलब्ध करवून देणाऱ्या वेस्टसाईडमध्ये पुरुषांसाठी देखील कपड्यांचे अनेक वेगवेगळे, आकर्षक पर्याय आहेत. युवकांना आवडणारे, आधुनिक स्टाईलचे न्यूऑन, एथनिक पद्धतीचे, निसर्गापासून प्रेरित कपड्यांपासून बनवलेले ईटीए, सर्वोत्तम शिलाईसाठी नावाजले जाणारे अस्कॉट, कॅज्युअल वॉर्डरोबमध्ये असलेच पाहिजे असे वेस्टस्पोर्ट, परफॉर्मन्स फॅब्रिकपासून बनवलेले फिटनेस वेअर स्टुडिओफिट व आधुनिक, आत्मविश्वासपूर्ण डब्ल्यूईएस अशा विविध कलेक्शन्समधून तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे निवडू शकता.
लहानग्यांसाठी कपड्यांची खरेदी करणे वेस्टसाईडमध्ये अगदी सोपे आहे. बेबी हॉप, हॉप असो किंवा वायअँडएफ असो ही सर्वच कलेक्शन्स आकाराने लहान असली तरी फॅशनच्या बाबतीत सर्वात अग्रेसर आहेत. तुमच्या लहानग्यांसाठी स्टायलिश कपड्यांची खरेदी करण्यासाठी वेस्टसाईड अगदी योग्य ठिकाण आहे.
ट्रेंट:
टाटा समूहातील ट्रेन्टची स्थापना १९९८ साली करण्यात आली. मुंबईत मुख्यालय असलेल्या या कंपनीने देशभरात सर्वत्र व्यवसाय विस्तार केला आहे. भारतातील सर्वात मोठी व सर्वाधिक वेगाने विकसित होणारी रिटेल शृंखला म्हणून नावाजल्या जाणाऱ्या वेस्टसाईडचे संचालन ट्रेंट करते.
या कंपनीने ९० शहरांमध्ये १६१ वेस्टसाईड स्टोअर्स सुरु केली आहेत. ही सर्व स्टोअर्स ८००० ते ३४००० चौरस फुटांची आहेत. वेस्टसाईडच्या प्रत्येक स्टोअरमध्ये त्यांच्या स्वतःच्या ब्रँडेड फॅशन कपड्यांची विशाल श्रेणी उपलब्ध असते. ट्रेंट कंपनीच्या रिटेल व्यवसायात वेस्टसाईडचे स्थान मध्यवर्ती आहे. स्त्री, पुरुष, लहान मुलांसाठीचे कपडे, पादत्राणे, कॉस्मेटिक्स, परफ्युम्स, हॅन्डबॅग्स, घरगुती फर्निचर ऍक्सेसरीज, अंतःवस्त्रे व भेटवस्तू असे वेगवेगळे विभाग वेस्टसाईडमध्ये तयार करण्यात आले आहेत.