Wednesday, March 18, 2026
Home Blog Page 6

*दुर्मिळ आतड्यांच्या आजारावर वेळेत केलेल्या आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे ३ दिवसांच्या नवजात बाळाचे वाचले प्राण*

0

वेळीच निदान व आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे आतडयांना बसलेल्या जीवघेण्या पिळ्यातून नवजात बाळाला जीवनदान
*सांगली* : मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथील डॉक्टरांनी इंटेस्टाइनल मॅलरोटेशन विथ मिडगट व्हॉल्व्युलस या दुर्मिळ आणि जन्मजात आतड्यांच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या केवळ ३ दिवसांच्या नवजात बाळावर यशस्वी उपचार केले. हा आजार वेळेत उपचार न झाल्यास काही तासांत जीवघेणा ठरू शकतो. लक्षणांची लवकर ओळख, तातडीची तपासणी आणि योग्य वेळी करण्यात आलेली शस्त्रक्रिया यामुळे बाळाचे प्राण वाचवणे शक्य झाले.
हे बाळ मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथेच जन्माला आले होते आणि सुरुवातीला त्याची प्रकृती स्थिर होती. मात्र दुसऱ्या दिवशी बाळाला दूध पिण्यात अडचण येऊ लागली आणि प्रत्येक फीडनंतर उलट्या होऊ लागल्या. ही धोक्याची चिन्हे ओळखताच बालरोग तज्ज्ञांच्या पथकाने तातडीने सखोल तपासण्या सुरू केल्या.
*या प्रकरणाबाबत माहिती देताना डॉ. परितोषा दलाल, सल्लागार – बालरोग व नवजात शल्यचिकीत्सक, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर म्हणाल्या,* “ही अवस्था म्हणजे शस्त्रक्रियेची तातडीची गरज असलेली आपत्कालीन परिस्थिती आहे. बाळाची तत्काळ तपासणी करण्यात आली आणि तातडीची पोटाची सोनोग्राफी तसेच इतर उच्चस्तरीय तपासण्या केल्या. त्यामध्ये लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात अडथळा निर्माण करणारा इंटेस्टाइनल मॅलरोटेशन विथ मिडगट व्हॉल्व्युलस हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीत चुकीच्या पद्धतीने बसलेली आतडी स्वतःच्या रक्तपुरवठ्याभोवती (सुपीरियर मेसेन्टेरिक आर्टरी) वळतात, ज्यामुळे आतड्यांना जाणारा रक्तपुरवठा थांबण्याचा आणि आतडी सडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे बाळाला तातडीने शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले.”
*त्या पुढे म्हणाल्या* , “अशा परिस्थितीत रक्तपुरवठा तात्काळ पूर्ववत करणे अत्यंत महत्त्वाचे असते, अन्यथा आतड्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.”
डॉ. परितोषा दलाल यांच्या नेतृत्वाखालील नवजात शस्त्रक्रिया डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक आतड्यांवर बसलेला पीळ सोडवून त्वरित रक्तपुरवठा पुन्हा सुरू केला आणि गँग्रीन होण्यापासून आतड्यांचे संरक्षण केले. या वेळी केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे बाळाची पचनसंस्था सुरक्षित राहिली.
त्या पुढे सांगतात, “अशा नवजात बाळांना नेक्रोटायझिंग एंटरोकॉलायटिस (NEC) या गंभीर आजाराचा धोका अधिक असतो, ज्यामुळे आतड्याला छिद्र पडू शकते. या बाळामध्येही पुढे अशीच स्थिती निर्माण झाली आणि खराब झालेला आतड्याचा भाग काढण्यासाठी आणखी एक आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर बाळाला नवजात अतिदक्षता विभागात (NICU) ठेवून सतत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि सखोल नवजात व शस्त्रक्रियात्मक उपचार देण्यात आले. सुमारे तीन आठवड्यांच्या उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिर झाली आणि त्याला घरी सोडण्यात आले. सध्या बाळाचे वजनवाढ व आहार नियमितपणे तपासला जात असून त्याच्या वाढीत सातत्याने सुधारणा दिसून येत आहे.”
आनंद मोटे, क्लस्टर डायरेक्टर, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे म्हणाले, “मणिपाल हॉस्पिटल्समध्ये दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतही उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सातत्याने दिली जाते. या प्रकरणातून विविध तज्ज्ञ विभागांमधील समन्वय, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एका छताखाली उपलब्ध असलेल्या सखोल वैद्यकीय अनुभवाचे महत्त्व अधोरेखित होते.”ही शस्त्रक्रिया बहुवैद्यकीय पथकाच्या सहकार्याने पार पडली. या पथकात बालशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. परितोषा दलाल, बालरोगतज्ज्ञ डॉ. मुबाशिशीर खान (निओनॅटोलॉजिस्ट) आणि डॉ. उज्ज्वला केसकर, तसेच नवजात अतिदक्षता विभाग आणि रेडिओलॉजी टीमचा समावेश होता.
हे यशस्वी प्रकरण नवजात बाळांमधील जीवघेणाऱ्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी वेळीच निदान, तातडीची शस्त्रक्रिया आणि रुग्णालयातील एकत्रित तज्ज्ञ सेवांची अत्यंत महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.

अदाणी एनर्जी सोल्युशन्सने सांगली फेस्टिव्हल 2025 मध्ये स्मार्ट मीटरबाबत जनजागृती केली

0

सांगली, महाराष्ट्र: डिजिटल सक्षमीकरण आणि वीज वापरातील पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने अदाणी एनर्जी सोल्युशन्सने अलीकडेच सांगली फेस्टिव्हल 2025 मध्ये ग्राहकांसाठी माहितीपर उपक्रम राबवला. भारतभर स्मार्ट मीटरचा वापर वाढवण्याच्या व्यापक मोहिमेचा भाग असलेल्या या उपक्रमाला उत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात स्मार्ट मीटर (टाइम ऑफ डे – टीओडी मीटर) चे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, ज्यामुळे हे मीटर कसे काम करतात हे नागरिकांना प्रत्यक्ष पाहता आणि समजता आले. माहिती फलक आणि संवादात्मक सादरीकरणांद्वारे हे तंत्रज्ञान सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आले. तसेच खास मोबाइल अ‍ॅपची माहिती देण्यात आली, ज्यामध्ये वीज वापराची थेट माहिती, तात्काळ सूचना मिळतात, हे दाखवण्यात आले. स्मार्ट सुविधांचे फायदे लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी माहितीपत्रकांचे वाटपही करण्यात आले.
नागरिकांकडून या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. “टीओडी मीटरमुळे वीज किती वापरली जाते हे समजते आणि अचानक येणारी मोठी वीज बिले कशी टाळता येतात, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक होते,” असे अदाणीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. “या तंत्रज्ञानामुळे वीज वापरावर स्पष्ट माहिती आणि नियंत्रण मिळते हे लोकांना खूप आवडले,” असेही त्यांनी नमूद केले.
स्मार्ट मीटरचे फायदे
स्मार्ट मीटरमुळे घरगुती आणि व्यावसायिक वीज वापर व्यवस्थापन अधिक सोपे आणि प्रभावी होत आहे. त्याचे मुख्य फायदे पुढीलप्रमाणे आहेत:
अचूक आणि पारदर्शक वीज बिल: स्मार्ट मीटरमुळे हाताने रीडिंग घेण्याची गरज राहत नाही आणि अंदाजे बिले येत नाहीत. ग्राहकांनी जितकी वीज वापरली आहे, तितकेच अचूक बिल भरावे लागते.
तत्काळ वीज वापराची माहिती: मोबाइल अ‍ॅपद्वारे वीज किती वापरली जात आहे, हे लगेच पाहता येते. त्यामुळे अनावश्यक वीज वापर ओळखता येतो आणि वीजेची बचत करता येते जलद सेवा आणि तक्रार निवारण: वीज खंडित होणे किंवा तांत्रिक बिघाड याची माहिती वीज कंपनीला दूरूनच मिळते. त्यामुळे दुरुस्ती लवकर होते आणि सेवा अधिक विश्वासार्ह होते.

• ग्राहक सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षण: कमी मागणीच्या वेळेत वीज वापरल्यास खर्च कमी होतो आणि कार्बन उत्सर्जनही कमी होते, ज्यामुळे पर्यावरणाची सुरक्षा होते.
सांगली फेस्टिव्हल 2025 मधील हा उपक्रम अदाणी एनर्जी सोल्युशन्सच्या ग्राहक-केंद्रित सेवा आणि शाश्वत भविष्याप्रती असलेल्या वचनबद्धतेचा भाग आहे. “स्मार्ट मीटर ही केवळ उपकरणे नाहीत, तर पारदर्शकता, कार्यक्षमता आणि ग्राहक सक्षमीकरणाचे साधन आहेत,” असे एईएसएलच्या प्रवक्त्याने सांगितले. “हे लोकांना त्यांच्या वीज वापरावर नियंत्रण देण्यास मदत करते आणि भारताच्या डिजिटल ऊर्जा परिवर्तनाला पाठबळ देते.”
रिवॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम अंतर्गत भारतात 25 कोटींपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती आणि विश्वास निर्माण करण्यासाठी अशा स्थानिक पातळीवरील उपक्रम खूप महत्वाचे आहेत. उत्सवातील एका नागरिकाने सांगितले, “आता मी नेमकी किती वीज वापरतो हे स्पष्टपणे पाहू शकतो आणि माझे वीज बिले व्यवस्थित हाताळताना मला अधिक आत्मविश्वास वाटतो.”