Wednesday, January 28, 2026
Home Sport *कॉफी विथ युथ आयकॉन कृष्णराज : रंकाळा तलावाच्या काठावर अनोखा उपक्रम*

*कॉफी विथ युथ आयकॉन कृष्णराज : रंकाळा तलावाच्या काठावर अनोखा उपक्रम*

Advertisements

कोल्हापूर (प्रतिनिधी):गर्दीने गजबजलेल्या रंकाळा तलावाच्या काठावर आज अनोखा उपक्रम रंगला. युवकांनी उपस्थित केलेल्या शहराच्या विकासासंदर्भातील प्रश्न आणि त्याला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दिलेली समर्पक आणि अभ्यासू उत्तरे यामुळे आजची संध्याकाळ संस्मरणीय बनली. महायुतीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दिले.
कोल्हापूरच्या तुलनेत अनेक शहरांचा सर्वांगीण विकास होतो. मात्र कोल्हापूर शहर अजूनही तुलनेने मागे राहिले आहे. इथले प्रश्न, समस्या अजूनही ३० वर्षानंतर तसेच प्रलंबित आहेत. त्यामुळे याबाबत युवा पिढीशी संवाद साधून त्यावर सकारात्मक पावले उचलण्याच्या दृष्टीने आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रंकाळा तलावाच्या काठावरील शालिनी पॅलेससमोर कॉफी विथ युथ…. या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. युवा मोर्चा कोल्हापूर महानगरच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी युवक- युवतींशी कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर मनमोकळा संवाद साधला. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शहरात महिलांसाठी पाच स्वच्छतागृह उभारणीसाठी निधी आणल्याचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत पवार यांनी स्पष्ट करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. दरम्यान कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन भाजपा राज्य सचिव महेश जाधव यांनी केले. महापालिकेची निवडणूक लोकसभा आणि विधानसभेपेक्षा अत्यंत वेगळ्या पद्धतीची असते. त्यामुळे येथे असणारे प्रश्न, मूळ समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत. या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. किशोर पवार, यश पाटील, पार्थ हर्षद, आदिती माने, शिवम बुचडे, दिलीप पाटील, तेजस मडिवाळ, वेदांत साळुंखे यांनी विचारलेल्या प्रश्नांना युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी समर्पक उत्तरे दिली. भविष्यात कोल्हापुरात औषध, रसायन, वाहन उद्योग येण्यासाठी हददवाढ गरजेची आहे. आयटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एमआयडीसीचा देखील विस्तार होणार आहे. रस्ते दर्जेदार मोठे बनवणे आवश्यक आहे. जोतिबा आणि अंबाबाई मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी झाल्यानंतर शहरात मोठमोठे हॉटेल्स, पार्किंग सुविधा, फ्लॅट्स, खानावळी, नाष्टा सेंटर, स्वच्छतागृह होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कचरा समस्या सुटेल. तसेच त्यावर आधारित वीज आणि खत प्रकल्प होतील. खेळाडूंसाठी देशपातळीवरची फुटबॉल प्रीमियर लीग कोल्हापुरात होणार आहे. तर प्रधानमंत्री कुशल रोजगार योजना केंद्र सक्षम बनणार आहेत. छत्रपती शाहू मिल सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न होणार आहेत. जिल्हावार रोजगार मिळावे आणि नोकर्‍या उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न, प्रदूषण मुक्त पंचगंगा आणि रंकाळा तलावसाठी एसटीपी प्लांट्स उभारले जातील. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी फ्लाय ओव्हर सारखे प्रकल्प कोल्हापुरात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांसाठी महायुतीला सत्ता देण्याचे आवाहन महाडिक यांनी केले. यावेळी युवा मोर्चाचे वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश घरपणकर, शाहरुख गडवाले, अमोल पालोजी, सुरज साखरे, अजिंक्य जाधव, पृथ्वीराज मोरे, रहीम सनदी, अवधूत अपराध यांच्यासह तरूण वर्ग उपस्थित होता.

RELATED ARTICLES

कोल्हापूर महापौर, उपमहापौर निवड ६ फेब्रुवारीला

*निवडीबाबत आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत होणार खलबते* कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीच्या तारखेची उत्सुकता संपली. पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर महापौर व उपमहापौर...

स्कोडा ऑटोने भारतात नवीन कुशाक सादर केली

कोल्हापूर, २२ जानेवारी २०२६: स्कोडा ऑटो इंडियाने भारतात अपडेटेड नवीन कुशाक एसयूव्ही सादर केली आहे. इंडिया 2.0 धोरणांतर्गत ही कंपनीची महत्त्वाची कार असून, युरोपियन...

इन्सुलिन उपचारांच्या भावनिक परिणामांवर मात करणे: भारतातील मधुमेहाच्या व्यवस्थापनातील अडथळे दूर करण्यासाठी तज्ञांनी नाविन्यपूर्ण जनजागृतीचे आवाहन केले आहे

शिक्षण देत, सक्षमीकरण करत आणि गैरसमज दूर करत मधुमेह उपचारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सिप्लाने #InhaleTheChange मोहीम सुरू केली आहे. , या आकड्यांमुळे वैद्यकीय आव्हानांचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर महापौर, उपमहापौर निवड ६ फेब्रुवारीला

*निवडीबाबत आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत होणार खलबते* कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीच्या तारखेची उत्सुकता संपली. पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर महापौर व उपमहापौर...

स्कोडा ऑटोने भारतात नवीन कुशाक सादर केली

कोल्हापूर, २२ जानेवारी २०२६: स्कोडा ऑटो इंडियाने भारतात अपडेटेड नवीन कुशाक एसयूव्ही सादर केली आहे. इंडिया 2.0 धोरणांतर्गत ही कंपनीची महत्त्वाची कार असून, युरोपियन...

इन्सुलिन उपचारांच्या भावनिक परिणामांवर मात करणे: भारतातील मधुमेहाच्या व्यवस्थापनातील अडथळे दूर करण्यासाठी तज्ञांनी नाविन्यपूर्ण जनजागृतीचे आवाहन केले आहे

शिक्षण देत, सक्षमीकरण करत आणि गैरसमज दूर करत मधुमेह उपचारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सिप्लाने #InhaleTheChange मोहीम सुरू केली आहे. , या आकड्यांमुळे वैद्यकीय आव्हानांचा...

मराठी झी ५ च्या वतीने आगामी ओरिजनल सिरीज देवखेळचा ट्रेलर प्रसिद्ध – पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ

चंद्रकांत लता गायकवाड दिग्दर्शित आणि निखिल पालांडे तसेच गौरव रेळेकर लिखित, सिने मास्टर्स प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित, कोकणी लोककथेत रुजलेला हा चित्तवेधक मानसशास्त्रीय...

Recent Comments