आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कथानकामुळे ‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम आणि पाठिंबा लाभला आहे. मालिकेच्या कथानकाचा काळ 20 वर्षांनी पुढे नेल्यानंतर छोटी गुड्डनच्या (कनिका मान) जीवनातील अनेक चढ-उतार दाखविल्यावर आता कथानकाला एक नवी कलाटणी मिळणार आहे. छोटी गुड्डनची आई गुड्डन (कनिका मान) हिचा तिचा पती अक्षत याच्याबरोबर मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले होते. ही मूळ गुड्डन आता आपल्या मुलीला पुष्पा (अनाहिता जहानबक्ष) आणि निया (मीरा मिश्रा) यांच्या दुष्ट कारस्थानांपासून वाचविण्यासाठी पुन्हा एकदा परतली आहे.
छोटी गुड्डनला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी पुष्पा आणि निया या विविध कट-कारस्थाने करीत असतात. पडद्यावर या दोघी जितक्या एकमेकींच्या जवळ आहेत, तितकेच त्यांच्यात वास्तव जीवनातही मैत्रीचे नाते आहे. मीराचा या मालिकेत प्रवेश झाल्यापासून या दोघींमध्ये घनिष्ठ मैत्री निर्माण झाली आहे. अलीकडेच मीराला आपल्या आईची खूप आठवण येऊ लागली, तेव्हा अनाहितानेच पुढाकार घेऊन तिचे सांत्त्वन केले आणि तिच्या मनावरचा ताण हलका केला होता.
यासंदर्भात मीरा मिश्रा म्हणाली, “काही दिवसांपूर्वी माझी आई आजारी पडली होती. अशा वेळी मी तिच्याजवळ राहू शकत नव्हते, या जाणिवेने मी मनातून फार दु:खी झाले होते. या गोष्टीने माझ्या मनावर इतका ताण आला की मी पुष्पामाँकडे (अनाहिता) गेले आणि जोरात रडू लागले. तिने मला घट्ट मिठी मारली आणि माझं सांत्त्वन केलं आणि नंतर ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली. तिथेही तिने माझी समजूत काढली. तिने स्वत: लिंबू सरबत बनवून मला दिलं. त्यामुळेही माझं मन शांत झालं. आजकाल कोणीही कोणासाठी इतकं करीत नाही. तिच्या या वर्तनाने मला वाटलं की ती माझ्यासाठी खास आहे. सावी ठाकूर हाही असाच एक जवळचा मित्र बनला आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार हे मला खूपच आधार देणारे आणि काम करताना खूप मजा करणारे आहेत. ही गोष्ट मी प्रथमच अनुभवते आहे.”
या दोघींमधील मैत्रीचे हे नाते असेच टिकून राहो, अशी आशा करूया. दरम्यान, नियाचे जीवन धोक्यात आले असून त्यास आपली छोटी गुड्डन हीच जबाबदार आहे, असे दिसते. पुष्पा आणि निया यांच्या कारस्थानाला छोटी गुड्डन बळी पडेल काय? की ऐनवेळी अगस्त्य तिच्या मदतीला धावून येईल?