कोल्हापूर ता.26 :- स्वच्छ भारत अभियाअंतर्गत आरोग्य कर्मचा-याच्या कामाचा सन्मान करुन त्यांचे मनोबल उंचावविण्याच्या उद्देशाने महापालिका प्रत्येक महिन्यामध्ये आरोग्य विभागाकडील उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणे दैनंदिनपणे प्रामाणिकपणे व उत्कृष्ठ काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचा-यांचा सत्कार करण्यात येतो.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते अशा उत्कष्ठ काम करणा-या कर्मचा-यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये झाडू कामगार तानाजी शिंदे, तानाजी वाकरेकर, हेमंत कांबळे, धनंजय कांबळे, अनिल चिंचवाडकर, दिपक पोवार, विनोद मोगले, संभाजी पाटोळे, शाहू बुचडे यांचा गौरव करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती शिक्षण संवाद अधिकारी निलेश पोतदार व आरोग्य निरिक्षक विकास भोसले यांनी केले.
यावेळी महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी या सफाई कर्मचा-यांबरोबरच येथून पुढे महापालिकेच्या विविध विभागामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात येईल असे जाहिर केले. यासाठी सर्व खातेप्रमुख यांनी त्याचे निकष तयार करुन आपल्या कार्यालयाकडील उत्कृष्ठ कर्मचा-यांची नांवे 15 ऑगस्टपुर्वी देण्याच्या सूचना केल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविंद्र आडसूळ, निखिल मोरे, सहा.आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य लेखापरिक्षक वर्षा परिट, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, नगरसचिव सुनिल बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्राबंरे, मुख्याध्यापिका सौ.अंजली जाधव, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी, अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.