नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021: सोनी इंडियाने नव्या XS-AW8 कॉम्पॅक्ट पॉवर्ड सबवुफरसोबत त्यांच्या इन-कार ऑफरींग्जच्या श्रेणीमध्ये नवीनतम भर सादर केली आहे. हा शक्तीशाली सबवुफर कॉम्पॅक्ट आणि अष्टपैलू स्वरूपातील घटकामध्ये उत्तम ऑडीओ ऑफर करतो. नवीन XS-AW8 सबवुफर तुम्हाला कारची जागा गमावल्याशिवाय बास वाढवण्यास मदत करतो, लहान मोठ्या कोणत्याही कारमध्ये त्रास-मुक्त जोमदार म्युजिक पुरवतो.
कॉम्पॅक्ट आणि अल्ट्रा-स्लिम सबवुफर जो कमीत कमी जागा घेतो.
XS-AW8 ची अल्ट्रा स्लिम रचना मर्यादित जागांमध्ये सहज इन्स्टॉलेशन करू देते आणि कार स्वच्छ आणि सखोल बेस लाईन्सने भरून टाकते.
चांगल्याप्रकारे रचना केलेले ड्रायव्हर युनिट आणि लो रेसोनन्स कास्ट-अल्युमिनियमचे एनक्लोजर
XS-AW8 त्याच्या कॉम्पॅक्ट परिमाणांमधून शक्तीशाली बास ध्वनी पुनरूत्पादित करतो, स्लिम एनक्लोजरची साचेबंद सबवुफर डायाफार्ग्मशी जुळणी केलेली आहे. बिल्ट-इन ॲम्प्लिफायरमध्ये ड्रायव्हर युनिट आणि एएमपीचे रक्षण करण्यासाठी भक्कम हिट-सिंग आहे जो नकोशी कंपने आणि हार्मोनिक विकृती होऊ देत नाही.
डायनामिक बाससह 160W पिक (75W RMS) आऊटपुट पॉवर
तुमच्या कारमध्ये अगदी मोठ्या आवाजातही अचूक आणि स्पष्ट लो एन्डसाठी तयार केलेल्या सोनीच्या मूळ पॉवर आयसीसोबत बिल्ट-इन क्लास A/B ॲम्प्लिफायरमधून 160W (75W RMS) स्पष्ट आणि डायनामिक बास ध्वनीची भर करा.
उच्च स्तरावरील इनपुट/ऑडीओ लाईन इनपुटकोणत्याही प्रिम्प आऊटपुट्ससोबत फॅक्टरी रेडीओ वापरत असताना, वापरकर्ते आता सहजपणे त्यांच्या रिसिव्हर स्पिकरचे आऊटपुट उच्च स्तरीय इनपुट्सशी कनेक्ट करू शकतात. जेव्हा रिसिव्हरमधून प्रि-आऊट सिग्नल्स उपलब्ध होतात, तेव्हा त्यांना CH1(R) आणि CH2(L) टर्मिनल्सशी कनेक्ट करते. उच्च वोल्टेज प्रि-आऊट अनुकूलता म्हणजे ग्राहक स्पष्ट ऑडीओ सिग्नल आणि कमी बाह्य ध्वनीसाठी 5V पर्यंत उच्च वोल्टेजपर्यंत वापरू शकतात.
सहजपणे आवाज कमी जास्त करण्यासाठी पुरवलेला वायर्ड रिमोट कमांडर
नवीन XS-AW8 हा वायर्ड रिमोट कमांडर सोबत येतो जो ग्राहकांना ड्रायव्हरच्या सीटमधून सहजपणे सबवुफरचा आवाज कमी करू देतो. सोप्या ट्युनिंगसोबत एका बाजूला कंट्रोल्स आणि टर्मिनल्सकनेक्शन आणि ॲम्प्लिफायर कंट्रोल्स हे सहज इन्स्टॉलेशन आणि ट्युनिंगसाठी एका बाजूला एकत्रितपणे स्थित आहेत. ॲम्प्लिफायरमध्ये स्पिकर-लेव्हल इनपुट्ससह पूर्ण-श्रेणी सोर्सेसला सोप्या कनेक्शनसाठी बदलणारे लो-पास फिल्टर हे वैशिष्ट्य आहे. स्विच वापरकर्त्यांना सबवुफर फेज आऊटपुट सानुकूलित करू देते, सिस्टीममधील इतर स्पिकर्समधून फेज कॅन्सेलेशनमधून घटलेला बास प्रतिसाद सादर करू देते.