प्रेम व रोमांसच्या या हंगामामध्ये एण्ड टीव्हीच्या सहाबहार जोड्या आणि त्यांच्यामधील रोमांस जाणून घेऊया. मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शेजारी-शेजारी राहणारे मनमोहन तिवारी (रोहिताश्व गौड) व विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) त्यांच्या भाभी अनिता (नेहा पेंडसे) व अंगूरी (शुभांगी अत्रे) यांना आकर्षून घेण्यासाठी प्रत्येक युक्तीचा वापर करण्यापासून मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील हप्पू (योगेश त्रिपाठी) व त्याची पत्नी राजेश (कामना पाठक) यांच्यामधील रूसणे, मनवणे आणि काटे (आश्ना किशोर) – कमलेश (संजय चौधरी) यांच्यामधील उदयोन्मुख कॉलेज रोमांसपर्यंत प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊया. अम्माजीचे (हिमानी शिवपुरी) तिचे स्वर्गीय पती खोदिलालप्रती (शरद व्यास) अतूट प्रेम कसे विसरून चालेल. तिच्या पतीचे भूत तिला आवश्यक सल्ला देत आहे, तसेच तिच्याकडे लक्ष देखील देत आहे. तुम्हाला फिल्मी विश्वामध्ये घेऊन जात आहेत मालिका ‘गुडिया हमारी सभी पे भारी’मधील पप्पू (मनमोहन तिवारी) व स्वीटी (श्वेता राजपूत). मालिका ‘संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं’मधील स्वाती (तन्वी डोग्रा) – इंद्रेश (आशिष कडियन) आदर्श पती-पत्नी बनण्याचे ध्येये ठरवत आहेत.
आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्हणाले, ”विभुतीला साधीभोळी दिसणारी अंगूरी भाभी (शुभांगी अत्रे) आवडते, तर तिवारीजीचा (रोहिताश्व गौड) विश्वास आहे की, मोहक अनिता (नेहा पेंडसे) आदर्श आधुनिक महिला आहे. हे दोन्ही पुरूष त्यांच्या पत्नींवर प्रेम करतात, पण त्यांचा दुस-याची बायको अधिक आकर्षक असण्यावर विश्वास आहे.” हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्मा म्हणाल्या, ”मालिका तीन पिढ्यांमधील प्रेमाच्या क्षणांना दाखवते – काटे (आश्ना किशोर) – कमलेश (संजय चौधरी) आनंदाने अडखळत इंग्रजीमध्ये संवाद बोलतात आणि एकमेकांच्या साहचर्याचा आनंद घेतात. हप्पू (योगेश त्रिपाठी) – राजेश (कामना पाठक) – एक शेर तर दुसरा सव्वाशेर. आणि सर्वांमध्ये मजेदार म्हणजे कटोरी अम्माचे तिचे स्वर्गीय पती खोदिलालसोबत (शरद व्यास) असलेले नाते. ती अनेकदा त्यांच्या फोटो फ्रेमसमोर हप्पूची वर्तणूक, राजेशची वृत्ती, मुलांचे गैरवर्तन इत्यादींबाबत तक्रार करते. त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही किंवा तिच्यासमोर प्रकटला नाही तर तिला त्यांच्याबाबत चिंता वाटते.” तन्वी डोग्रा ऊर्फ स्वाती म्हणाल्या, ”इंद्रेश (आशिष कडियन) व स्वाती ही परिपूर्ण पती-पत्नी जोडी आहे. त्यांच्यामध्ये इतर जोडप्यांप्रमाणे गैरसमज आहेत, पण ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. मालिकेमध्ये पौलोमी (सारा खान), सिंघासन सिंग (सुनिल सिंग) आणि बबली व देवेश (धीरज राय) यांनी त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यामधून देखील मार्ग सापडला.” मनमोहन तिवारी ऊर्फ पप्पू म्हणाले, ”पप्पू व त्याची पत्नी स्वीटी (श्वेता राजपूत) यांच्यामध्ये फिल्मी रोमांस आहे. त्यांना रोमँटिक चित्रपट गाण्यांवर नृत्य करायला आणि गाणी म्हणायला आवडते. त्यांच्यामधील केमिस्ट्री मजेशीर व अत्यंत मनोरंजनपूर्ण आहे.”