कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील एका नामांकित हॉटेलमध्ये जेवणात पाल सापडल्याचा बहाणा करून कांगावा करणाऱ्या तरुणांचे कारस्थान हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे उघडकीस आले आहे दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर जेवणामध्ये पाल सापडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याबद्दल हॉटेल प्रशासनाने सीसीटीवी फुटेज दाखवत बदनामीसाठीचा कांगावा केला गेला असल्याचे हॉटेलचे मालक निवास बाचुळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
शनिवारी रात्री दहा ते बारा जणांचा ग्रुप संबंधित हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता त्यानंतर या तरुणांनी आपल्या मोबाईलवर जेवणामध्ये पाल सापडल्याचा व्हिडिओ करत तरुणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली यावेळी तिथे हॉटेलचे मालक आले असता संबंधित तरुणांनी कर्मचाऱ्यांचे हॉटेल मालकांवर हात उचलला या प्रकाराने गोंधळ सुरू झाल्यानंतर इतर ग्राहकांना त्रास होत असल्याने प्रशासनाने मारामारी करणाऱ्या तरुणांना हॉटेल बाहेर काढले या संधीचा फायदा घेऊन हॉटेलचे नाव टाकून बनवलेला व्हिडिओ संबंधीत तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. ही हॉटेलची नाहक बदनामी टाळण्यासाठी हॉटेलने फुटेज पत्रकार परिषदेत आज पत्रकारांना दाखविले. या फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की बसलेल्या तरुणांपैकी एका कडेला बसलेला तरुण जेवण सुरू असताना प्रथमतः मित्राची व्हेज डिश आपल्यासमोर घेतो. नंतर डाव्या हाताने पाठीमागील खिशातून पाल काढून ती भाजी मध्ये टाकतो नंतर सीसीटीवी मध्ये स्पष्ट दिसू नये म्हणून ती भाजी मिक्स करून घेतो यानंतर मित्रा जवळ देतो यावेळी तो मित्र त्यातील भाजी वाढून घेऊन त्यामधील पाल शोधू लागतो पण त्याला ती सापडत नाही यावेळी शेजारचा मित्र ती पाल शोधून काढतो आणि समोरच्या मोकळ्या डिशमध्ये ठेवून दुसऱ्या मित्राला व्हिडिओ बनवायला सांगतो हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने स्पष्ट करून यापुढे संबंधीत तरुणांवर कठोर कारवाई होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे निवास बाचुळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.