कोल्हापूर/प्रतिनिधी :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च रोजी सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील एकावन्न कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यामध्ये इच्छुक महिलांनी आपली माहिती कळवावी, असे आवाहन सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
आठ मार्च या जागतिक महिला दिनी हॉटेल जोतिबा मध्ये दुपारी चार वाजता हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि ट्रॉपी असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एक्कावन महिलांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेचे राज्य अध्यक्ष सुहास सावरडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कारासाठी इच्छुक महिलांनी आपली माहिती देण्याचे आवाहन संघटनेच्या शहर महिला अध्यक्ष किरण तहसीलदार यांनी केले आहे.यासाठी ९८५०६१९२९२,७२४९५४३१६५ या क्रमांकावर संपर्क करून आपली माहिती पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील, राज्य उपाध्यक्ष रामदास पवार, कादंबरी मोरे, संगीता जाधव, शुभांगी देसाई, सुहास कर्णे, महेश कांबळे, सुहास मोरे, प्रसन्नजीत करांडे, भरत पाटील आदी उपस्थितीत होते.