विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न केलेल्या 49 नागरीकांच्याकडून 76 हजार रुपये दंड वसूल
कोल्हापूर, दि. 22 :- शहरामध्ये 11 नंतर दुकाने सुरु ठेवणाऱ्या 2 बिअरबार, 5 हॉटेल व्यवसायिक व इलेक्ट्रीकचे गोडावून चालू ठेवणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करुन 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे शहरामध्ये विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने 49 नागरीक व व्यापाऱ्यांकडून 76 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरामध्ये शासनाच्या आदेशानुसार 11 नंतर औषधे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. बुधवार दि.21 एप्रिल 2021 रोजी मिरजकर तिकटी येथील रविराज बिअरबार, संभाजीनगर येथील इंदिरासागर बिअरबार यांना प्रत्येकी 5 हजार रुपये तर पितळी गणपती येथील 3 हॉटेलवर प्रत्येकी 1 हजार रुपये असे एकूण 15 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. त्याचप्रमाणे आज पद्मा टॉकीज जवळील आर के लाईट हाऊस यांनी गोडावून चालू ठेवून गोडावूनमधून इलेक्ट्रीक मॉल विकल्याबद्दल त्यांच्याकडून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून 149 लोकांकडून 76 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल बुधवार, दि.21 एप्रिल 2021 रोजी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क 146 लोकांनकडून 73000, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने 3 नागरीकांकडून 3000 असे एकुन 76 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरामध्ये गर्दी वाढत असलेने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सन, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.