कोल्हापूर ता. 05 : दसरा चौक वाहतूक नियंत्रण शाखा येथे नागरीकांची बुधवार दि.5 मे 2021 रोजी मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यावेळी लक्ष्मीपूरी पसिरातील एका नागरीकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरामध्ये संचारबंदी आहे परंतू अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरीक गर्दी करत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. दसरा चौक वाहतूक नियंत्रण शाखा येथे 72 नागरीकांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 71 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर एका नागरीकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.