दिनांक 29 एप्रिल ते 5 मे 2021 पर्यंत ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या पात्र लाभार्थींचेच कोविशिल्डच्या दुस-या डोसचे लसीकरण
कोल्हापूर ता.05 : 45 वर्षावरील कोविशिल्डच्या दुस-या डोससाठी सर्व पात्र लाभार्थ्यांचे गुरुवार दि.6 मे 2021 रोजी महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दिनांक 29 एप्रिल ते 5 मे 2021 पर्यंत ज्यांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेली आहे. अशा पात्र लाभार्थींचेच कोविशिल्डच्या दुस-या डोसचे लसीकरण दि.6 मे 2021 रोजी करण्यात येणार आहे.
45 वर्षावरील कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांचे पूर्ण संरक्षण करणे अतिमहत्वाचे आहे. त्यामुळे 45 वर्षावरील कोविशिल्डच्या दुस-या डोससाठी सर्व पात्र लाभार्थींनी महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपूरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिध्दार्थ नगर व मोरे माने नगर या ठिकाणी कोविशिल्डच्या दुस-या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दिनांक 29 एप्रिल ते 5 मे 2021 पर्यंतची ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेली आहे. अशा पात्र लाभार्थींचेच कोविशिल्डच्या दुस-या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. याकरीता पात्र लाभार्थींना संबंधीत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरुन कोविशिल्डच्या दुस-या डोससाठी फोन येईल त्यांनीच फक्त संबंधीत लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे. येताना सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे. ज्या 45 वर्षावरील नागरीकांची ऑनलाईन अपॉईंटमेंट नाही त्यांना लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नाही. त्यामुळे नागरीकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.