कोल्हापूर ता.20 :- शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छताअभियानामध्ये एक टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा 112 वा रविवार असून या अभियानामध्ये मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, स्वच्छता दूत अमित देशपांडे, स्वरा फौंडेशन, वृक्षप्रेमी संस्था व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. हि मोहिम महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली. सदरची स्वच्छता मोहिम रंकाळा टॉवर परिसर, गाडी अड्डा, परिसर येथे करण्यात आली.
स्वरा फौंडेशनच्यावतीने आर.टि.ओ ऑफिस, ताराबाई पार्क ते पितळी गणपती या मेनरोडच्या बाजूला कोरोना योद्धा आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे व साई हॉस्पिटलचे डॉ.राहुल गंणबावले यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन ट्री गार्ड बसविण्यात आले. यावेळी कदंब, वड, पिंपळ, कांचन, कडुलिंब, बदाम ही झाडे लावण्यात आली. यावेळी स्वरा फौंडेशनचे डायरेक्टर प्राजक्ता माजगावकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रम्बरे, आकाश कांबळे, सुधाकर पुरेकर, उदय गायकवाड, प्रमोद माजगावकर, शेखर वडणगेकर, अमृता वास्कर, रमेश नेर्लेकर व सदस्य उपस्थित होते.
त्याचप्रमाणे वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत चांदणी चौक, दुर्गामाता गल्ली व लक्ष्मीपुरी येथे “ऑक्सीजन आपल्या दारी” या मोहिमेअंतर्गत सोनचाफा, पारिजात, टीकोमा ,कडुलिंब, सदाफुली, पांढरी सावर, करंज अशी देशी झुडूप पद्धतीची फुलझाडे लावण्यात आली. यावेळी विठ्ठल माने यांनी झाडे व माजी महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी लोखंडी ट्री गार्ड उपलब्ध करून दिले. या मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, अमित यादव, अक्षय कांबळे, स्वप्निल खाडे, सौ विद्या पाथरे, सौ सविता साळुंखे, राजेश नायर ,अमर पोवार, गणेश धुमाळ, परितोष उरकुडे, सतीश कोरडे, सचिन पवार ,तात्या गोवा वाला, अथर्व गोडसे आदी सदस्य उपस्थित होते.
या स्वच्छता मोहिमेत 3 जेसीबी, 3 डंपर, 2 आरसी गाडया, 3 औषध फवारणीचा वापर करण्यात आला. तसेच सदरची मोहिम महापालिकेच्या 35 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने राबविण्यात आली. यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरिक्षक शिवाजी शिंदे, महेश भोसले, शुभांगी पोवार, मनोज लोट व कर्मचारी उपस्थित होते.