कोल्हापूर ता.24 : शहरामध्ये डेंग्यु, चिकनगुनियाची साथ येऊ नये यासाठी महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून दैनंदिन औषध फवारणी, धुर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. गुरुवारी शहरातील 14 प्रभागामध्ये 4431 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले निर्देशाप्रमाणे संपुर्ण शहर परीसराध्ये दि.23 व 24 जून 2021 रोजी शहरामध्ये आरोग्य विभागामार्फत सर्व्हे करण्यात येत आहे. गुरुवारी प्रभाग क्र. 1,2,7,8,9,10,25,35,44,46,47,61,62,71 मधील 4431 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये 6826 कंटेनरचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये डेंग्यु सदृश्य 203 ठिकाणी डांस अळी आढळून आल्या. यावेळी दूषीत पाण्याच्या 203 ठिकाणी औषध फवारणी, धुर फवारणी करण्यात आली. सदरचे सर्व्हेक्षण व औषध फवारणी 28 स्प्रे पंप, 14 धुर फवारणी मशीन व 49 कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात आली. सर्व्हेक्षणादरम्यान दूषीत पाण्याच्या ठिकाणी असलेल्या टायरी जप्त करुन पाण्याच्या ठिकाणी गप्पी मासे कर्मचाऱ्यांमार्फत सोडण्यात आले. यावेळी मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, सर्व वॉर्ड आरोग्य निरिक्षक, मुकादम व कर्मचारी उपस्थित होते.
तरी शहरातील नागरीकांनी डेंग्यु, चिकनगुनिया ची लक्षणे आढळलेस महापालिकेच्या आरोग्य विभागास अथवा शासकीय रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा. सेप्टीक टँक व्हेंट पाईपला जाळी बसविणेत यावी. आठवडयामध्ये एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा. फ्रिजमधील डिफ्रॉस स्ट्रेमधील पाणी आठ दिवसातुन एकदा रिकामे करण्यात यावे. घराजवळील परिसरामध्ये रिकामे टायर, नारळाच्या करवंटया, डबे इत्यादीमध्ये पाणी साचू देऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.