कोल्हापूर दि.२४ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र – प्रदेश कार्यसमितीची बैठक आज दिनांक २४ रोजी व्हर्चुअल आणि फिजिकल अशा पद्धतीने संपन्न झाली. कोल्हापूर येथे इंद्रप्रस्थ हॉल, राजारामपुरी याठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी व्हर्चुअल पद्धतीने मिटिंगमध्ये सहभाग घेतला.
कार्यकारणीच्या सुरवातीला विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस यांनी e – प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सात वर्षातील महत्वाची व वैचारिक कामगिरी याबद्दल विस्तृत माहिती सांगितली. २०१४ पासून पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी लोक हिताचे, देश हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. वीज कनेक्शन, पाणी व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना, उज्वला गॅस योजना, मुद्रा कर्ज योजाना, घर-घर शौचालय, राम मंदिर, ३७० कलम, नागरिकत्व कायदा अशा अनेक प्रलंबित प्रश्न या सात वर्षाच्या कालावधीत सोडवले आहेत. अंत्योदय या विचारातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि योजनांचा लाभ मोदीजींनी पोचवला आहे. संरक्षणाच्या बाबतीत अनेक विकासात्मक निर्णय घेऊन भारतीय जवानांना बळ देण्याचे कार्य गतीने झाल्याचे सांगितले.
यानंतर प्रदेश कार्यकारणीची सुरवात हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कोल्हापूरात मा.सुरेश हाळवणकर, मा.धनंजय महाडिक, मा.महेश जाधव, मा.राहूल चिकोडे, मा.अशोक देसाई, मा.नाथाजी पाटील, मा.विठ्ठल पाटील, मा.विजय जाधव यांनी दीप प्रज्वलन केले.
खासदार डॉ.भागवत कराड यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांना आदरांजली वाहून शोक प्रस्ताव सादर केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, व्हर्च्युअली आपण एकमेकांशी अधिक समन्वयाने राहिल्याने जगातील कोणत्याही राजकीय पक्षाने केली नसेल अशी सेवेची आणि आंदोलनाची कामगिरी आपण केली. कोरोना असल्याने सगळे जण कुलूप लावून आपापल्या घरात बसतील असं या महाविकास आघाडी सरकारला कोरोना काळात वाटत होतं. परंतु नागरिकांनी रस्त्यावर उतरून, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून राज्य सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. या सरकारला कोणत्याही प्रकारचे सामान्य माणसाचे देणेघेणे राहिले नाही. सरकार स्थापनेपासूनच या सरकारला सातत्याने आपले सरकार उद्या पडणार असे वाटते. त्यामुळे आजचा दिवस आपल्या कमाईचा असून कमाई करण्यात धन्यता मानणारे सरकार असल्याचे सांगितले. कोडगेपनाचं टोक म्हणजे राज्यातील महाविकास आघाडी सरकार आहे. जनतेच्या हिताचे काम न करण्याच्या वृत्तीमुळे राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मराठा, ओ.बी.सी.आरक्षणामुळे राज्यात संघर्षाची परिस्थिती आहे. अनेक महत्वपूर्ण विषयांचे विषयांतर करणे हाच रोजचा नित्यक्रम महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे.
यानंतर महाराष्ट्रराज्य प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस मा.सी.टी.राव यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. आमदार आशिष शेलार यांनी राजकीय ठराव सादर केला त्यास प्रदेश उपाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांनी अनुमोदन केले. भोजनोत्तर दुसऱ्या सत्रा मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस किसान मोर्चा डॉ.अनिल बोंडे यांनी कृषी ठराव सादर केला प्रदेश अध्यक्ष किसान मोर्चा श्री वासुदेव काळे यांनी अनुमोदन दिले. यानंतर प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणाऱ्या आगामी कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.
प्रदेश कार्यकारणीच्या समारोपामध्ये विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची आजची परिस्थिती जी आहे, ती पाहिली की, मनात प्रश्न येतो, याला सरकार म्हणता येईल का? या सरकारची अवस्था अशी आहे की, मंत्री झाले एकेक विभागाचे राजे अन प्रत्येक विभागात एकेक वाझे. या सरकारने कोविडमध्ये उत्तम काम केले अशी पाठ थोपटली जाते, तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, तुमचे डोके ठिकाणावर आहे का ? सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. या सरकारच्या वागणुकीतून अनेक प्रश्न निर्माण होतात. मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का ? नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे महाराष्ट्रात आहे का ? एकतरी जंबो कोविड सेंटर मुंबईच्या बाहेर उघडले का ? विविध विभागातील वाझेंचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे. तो आम्हाला सांगता येऊ नये म्हणून अधिवेशन दोन दिवसांचे केले आहे. केवळ आणि केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले. केंद्राकडे डेटाची मागणी ही ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षण टिकविण्यासाठी पण महाविकास आघाडी सरकारला ५० टक्क्यांच्या खालचे आरक्षण सुद्धा टिकविता आले नाही. १५ महिने राज्य मागासवर्ग आयोग तयारच केला नाही. केवळ न्यायालयात तारखा मागत राहिले त्यामुळे ५० टक्क्यांच्या आतले ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे पाप हे केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचे आहे. या आरक्षणासाठी जनगणनेची नाही तर एम्पिरीकल डेटाची गरज पण, यांना केवळ राजकारण करायचे आहे. या सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नाही. आरक्षण देण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. २६ तारखेचे आंदोलन करून भाजपा शांत बसणार नाही. ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर शांत बसणार नाही. फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवून राजकारण करणे, हे एकमेव काम सरकार करते आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त खोटे बोलणे, या सरकारचे एवढे एकच काम. या सरकारने विधिमंडळ बंद केले. या सरकारने लोकशाहीची दारं बंद करून टाकली असली तरी लोकशाही पुनर्स्थापित कशी करायची हे आम्हाला ठावूक आहे. सकाळी ११ पासून सुरु झालेल्या या अधिवेशनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
याप्रसंगी मा.सुरेश हाळवणकर, मा.धनंजय महाडिक, मा.महेश जाधव, मा.राहूल चिकोडे, मा.हिंदुराव शेळके, मा.बाबा देसाई, मा.अशोक देसाई, मा.नाथाजी पाटील, मा.विजय जाधव, मा.दिलीप मेत्राणी, मा.हेमंत आराध्ये, मा.गणेश देसाई, मा.विठ्ठल पाटील, मा.सुनील मगदूम, मंडल अध्यक्ष डॉ.राजवर्धन, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी, संतोष माळी, राजेश पाटील, अनिल डाळ्या, राजवर्धन निंबाळकर, रमेश यळगुडकर, विजय रेडेकर, सचिन शिपुगडे, संदीप पाटील, हंबीरराव पाटील, महेश मोरे, संभाजी आरडे, संजय पाटील, विनायक परुळेकर, सुधीर कुंभार, विठ्ठल पाटील, नामदेव पाटील यांची उपस्थिती होती.