कोल्हापूर : ता.२८ दूध उत्पादकांना व संघाच्या प्रशिक्षण केंद्राकडे येणाऱ्या प्रशिक्षणाथींना आयुर्वेदिक गुणकारी असलेल्या वनस्पतीची माहिती होण्यासाठी हर्बल गार्डनची निर्मिती केली असून त्याचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी ) व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या उपस्थितीत झाले.
सदर हर्बल गार्डनमध्ये कोरफड, आडूळसा, शतावरी, हळद , तुळस, गुळवेल, हाडजोड, शेवगा ,कडीपत्ता , कडुनिंब, लिंबू,लाजाळू इ वनस्पतींचा प्रात्यक्षिक प्लॉट केला असून सदरच्या वनस्पतीची वापर प्रामुख्याने जनावरांच्या मस्टायसिस व इतर आजार ताप,डायरिया,अपचन,विषबाधा ,लाळ खुरकत बरे करण्यासाठी केला जातो व याची माहिती सर्व दूध उत्पादकांना संघाच्या परिपत्रका द्वारे कळवली आहे याचा उपचाराचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा
तसेच ताराबाई पार्क येथे जनावरांच्या रोग निदान प्रयोगशाळेचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी ) यांनी केले. यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले गोकुळ आपल्या कार्यक्षेत्रातील जनावरासाठी पशुवैद्यकीय सेवा अत्यंत प्रभावीपणे राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून जनावरांना झालेल्या रोगाच्या अचुक निदान ताडतडीने होण्यासाठी रक्त,मलमूत्र याची तपासणी होणे गरजचे असते. त्यामुळे वेळेत उपचार करता येतात या सर्व जनावरांच्या तपसणीसाठी संघाकडून नाममात्र शुल्क आकारण्यात येते .
याप्रसंगी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी), माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.यु.व्ही.मोगले, सहा. व्यवस्थापक डॉ.प्रकाश दळवी, डॉ.पी.जे.साळोखे,डॉ.अश्विनी टारे,डॉ.मगरे,डॉ.गोरे तसेच पशुसंवर्धन विभागाकडील डॉक्टर,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.