मुंबई २२ ऑक्टोबर २०२१ : सोनी मराठीवरील गाथा नवनाथांची आणि ज्ञानेश्वर माउली या मालिका सध्या रोज एक तास प्रेक्षकांना भक्तिरसाचा आनंद देत आहेत. पण २५ ऑक्टोबर पासून या आनंदात भर पडणार आहे. प्रेक्षकांना संध्याकाळी ६. ३० वाजल्यापासून दीड तास या भक्तीरसाचा आस्वाद घेता येणार आहे या दीड तासात गाथा नवनाथांची मालिकेत मच्छिन्द्रनाथांचे स्त्रीतराज्यात आगमन होणार असून राज्यातल्या स्त्रियांना नाथांबद्दल कुतूहल आहे. लवकरच मैनावतीचा नाथांशी विवाह होणार असल्याची शक्यता आहे. मैनावतीने पाठवलेल्या गोष्टी नाथ स्वीकारणार का , मैनावतीने जाहीर केलेल्या उत्सवाला नवीन वेष परिधान करून जाणार का , याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे. मालिकेत मोठ्या गोरक्षनाथांचा प्रवेश हि होणार आहे. गुरु संकटात आहेत आणि त्यांना शोधून त्या संकटातून सोडवला पाहिजे या हेतूने गोरक्षनाथांचा प्रवास सुरु होताना दिसणार आहे.
तर ज्ञानेश्वर माउली मालिकेत माउली आणि त्यांची भावंडं यांचा आई वडिलांच्या देहान्त प्रायश्चित्तानंतरचा खडतर प्रवास सुरु होणार आहे. मुक्ताई आजारी पडल्यावर तिच्यासाठी सप्तपर्णीचे वेळ आणण्यासाठी माउली स्वतः निबिड अरण्यात जाणार तिथे त्याचा सापाशी सामना होणार आहे
माउलींना स्फुरलेला दिवाळी अभंग, त्यांनी साजरी केलेली दिवाळी, शुद्धिपत्रासाठी सुरू झालेली पैठण यात्रा आणि माउलींकडून झालेली हरिपाठाची निर्मिती; असे अनेक अनोखे प्रसंग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. अनुभवा, भक्तीरसाचा दीड तास, २५ ऑक्टोबरपासून संध्याकाळी ६.३० वा.सोम.- शनि. सोनी मराठी
—