कोल्हापूर ता.27 : कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत महत्वकांक्षी कोविड लसीकरण मोहिम महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील सर्व शाळेमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचे शाळेतच कोविड-19 लसीकरण करण्यात येत आहे. बुधवारी सिध्दार्थनगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत छत्रपती शाहू महाराज विद्यामंदीर येथे विद्यार्थ्यांच्या पालकांचे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी 125 पालकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 59 व दुसरा डोस 66 पालकांना देण्यात आला. यावेळी छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, उपायुक्त रविकांत आडसूळ, वैदयकिय अधिकारी डॉ.विश्वनाथ खैरमोडे, विद्यालयातील शिक्षक व सिध्दार्थनगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचारी उपस्थित होते.