कोल्हापूर ता.16 : शहरातील खुल्या जागा व इमारतींना मालमत्ता कर आकारणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विभागीय कार्यालय क्र.1 ते 4 अंतर्गत 271 प्रकरणे नांवे हस्तांतराची व 49 नविन कर आकारणी प्रकरणे मंजूर करण्यात आली. या विशेष कॅम्पचे दि.13 ते 16 डिसेंबर अखेर विभागीय कार्यालय वाईज आयोजन करण्यात आले होते. नागरीकांना घरफाळा लावणेसाठी वांरवार घरफाळा विभागात फे-या मारायला लागू नये व तात्काळ घरफाळा लावून मिळावा. महापालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रशासक डॉ.कादंबदी बलकवडे यांच्या सूचनेनुसार हा कॅम्प घेण्यात आला.
या चार दिवसाच्या कॅम्पमध्ये नाव हस्तांतरणाची 240 प्रलंबीत कामापैकी 234 कामे निर्गत केली असून नविन कर आकारणी प्रलंबीत 49 कामापैकी 21 कामे निर्गत करण्यात आली. तर प्रलंबीत हस्तांरतरणाच्या नविन 75 कामांपैकी 37 कामे निर्गत करण्यात आली. समक्ष कॅम्पमध्ये दाखल झालेल्या 65 प्रकरणांपैकी 28 प्रकरणे मंजूर करण्यात आली. कागदपत्रे अपुर्ण असलेल्या 75 प्रकरणाना कागदपत्रे पुर्तता करण्यासाठी जागेवर नोटीसा देण्यात आल्या.
छ.ताराराणी मार्केट अंतर्गत नांवे हस्तांतराची 76 प्रकरणे व नविन कर आकारणी 39 प्रकरणे मंजूर-गुरुवारी ई वॉर्ड विभागीय कार्यालय क्रं.4 छत्रपती ताराराणी मार्केट, कावळा नाका अंतर्गत नांवे हस्तांतराची 76 प्रकरणे व नविन कर आकारणी 39 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यावेळी उप-आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, प्र.कर अधिक्षक विजय वणकुंद्रे उपस्थित होते.
या कॅम्पमध्ये नाव हस्तांतरणाची 76 प्रलंबीत कामापैकी 76 कामे निर्गत केली असून नविन कर आकारणी प्रलंबीत 30 कामापैकी 21 कामे निर्गत करण्यात आली. तर समक्ष दाखल झालेल्या हस्तांरतरणाच्या नविन 7 प्रकरणांना कागदपत्रे अपुर्ण असलेने जागेवर नोटीस देण्यात आली. तर नविन कर आकारणी करणेसाठी 21 कामे दाखल झाली होती. यापैकी 18 कामे निर्गत झाली असून यामध्ये 3 मिळकत धारकांना अपूरी कागदपत्रे असलेने ती पुर्तता करण्यासाठी जागेवरच संबंधीतांना नोटीस देण्यात आली.