ती आणि ती , वेल डन बेबी चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेवून येत आहेत .नुकतेच त्यांनी व्हिक्टोरिया या मराठी चित्रपटाची घोषणा केली . पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका या चित्रपटात आहे . हीरा सोहल ही अभिनेत्री पदार्पण करत आहे .
जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत .या चित्रपटाची कथा , पटकथा व संवाद ओमकार गोखले , जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांची निर्मिती संस्था गुसबम्पस एंटरटेनमेंट चा एकत्रित तिसरा मराठी चित्रपट आहे .तसेच अभिनेता पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णी सह हा तिसरा चित्रपट आहे , या पूर्वी ती आणि ती , तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत .आनंद पंडित , रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत , वैशल शाह हे सह निर्माता आहेत .नुकतेच या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला आणि या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे .